
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या रोडूआण्णा गोविंदराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयात
“ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला” ही रचना लिहिणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे समन्वयक निंबाजी शिंदे होते. समवेत संस्थेच्या अध्यक्षा कासुताई रोडू अण्णा पाटील, सचिव महेंद्र पाटील ,प्राचार्य सद्दाम अली अन्सारी प्रा. सुदय बोरसे,योगेश ठोके प्रा. शारिक एन.एस.एस.प्रमुख निसार वानखेडे आर के शिंदे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अमोल अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.दीपक बोरसे यांनी केले, प्रा.प्रशांत देवरे यांनी आभार मानलेत.
