
नाशिक ( प्रतिनिधी )दिनांक २७ फेब्रुवारी :- नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेली यशवंत व्यायाम शाळा ही संस्था १ मार्च, २०२६ रोजी ११० वर्षांमध्ये पदार्पण करत आहे. यशवंत व्यायाम शाळेची स्थापना सन १९१७ साली झाली आहे. या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक १ मार्च, २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता ११०वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभागाचे महसूल आयुक्त मा श्री. डॉ. प्रवीण गेडाम (भाप्रसे) आणि जिल्हाधिकारी मा. श्री आयुष्य प्रसाद (भाप्रसे) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यशवंत व्यायाम शाळेच्या कार्यासाठी आणि उत्तोरोत्तर प्रगतीसाठी कायमच नाशिकच्या दानशूर नागरीकाकडून भरघोष अश्या वस्तुरूपी आणि रोख स्वरूपात देणग्या मिळत आहेत. केवळ यामुळेच संस्था क्रीडा क्षेत्रात चांगली वाटचाल करत आहे. या मान्यवरांचे ऋण म्हणून त्यांना गौरवण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून विविध खेळामध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंना गौरवण्यात येणार आहे. यावेळी संस्थेमध्ये असलेल्या मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, ज्यूदो या खेळांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत.या वेळी गेल्या १०९ वर्षांमध्ये संस्थेने केलेली वाटचाल याचा आढावा सादर करण्यात येणार आहे आणि पुढील काळामध्ये खेळाडूंना आणखी चांगल्या सुविधा मिळव्या यासाठी संस्थेच्या वतीने आणखी काय करता येईल याचा आढावा सादर करण्यात येणार आहे.
तरी नाशिकच्या सर्व क्रीडाप्रेमींनी आपल्या या घरच्या कार्यक्रमामध्ये हिरीरीने सहभागी व्हावे असे आवहान संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
फोटो – कार्यक्रम प्रत्रिका.

