
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१९५ वा दिवस
विज्ञान हे प्रायोगिक आहे तर अध्यात्म अनुभवात्मक आहे. भारताच्या प्रगतीसाठी भौतिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि वेदान्ताची सांगड घालण्याची आवश्यकता आहे. विज्ञानाचा उपयोग प्रामुख्याने मानवाच्या कल्याणासाठी केला पाहिजे आणि त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग गरिबी दूर करण्यासाठी व्हायला हवा. विज्ञान हे केवळ भौतिक प्रगतीचे साधन नसून, ते सत्य शोधण्याची पध्दती आहे. विज्ञानाने भौतिक जगात प्रगती करावी आणि अध्यात्माने मानवी मनाला उन्नत करावे. युवकांनी पाश्चात्य तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञान शिकावे, जेणेकरून भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर होऊ शकेल
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन ९ शके १९४७
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २८ फेब्रुवारी २०२६
★ १९३१ डॉ. सी. व्ही. रमण यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
★ राष्ट्रीय विज्ञान दिन.
★ १९३६ भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा स्मृतिदिन
★ १९६३ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा स्मृतिदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
