
सावरगाव ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील भूमिपुत्र व सामाजिक कार्यकर्ते तसेच अखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री भरतभाऊ भावराव राठोड यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी स्पर्धेत सहभागी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धेत खेळण्यासाठी प्रिंटेड टी-शर्ट दिले आहेत. त्याबद्दल श्री भरतभाऊ राठोड यांचे नांदगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. श्रीकिसन खातळे साहेब व गटशिक्षणाधिकारी श्री. दिलीप नाईकवाडे साहेब यांनी आभार व्यक्त केले..
