
रोहिले बु. ( प्रतिनिधी) दि. 27 फेब्रुवारी लेखक वि वा शिरवाडकर यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कविता गायन. मुख वाचन. घेण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी बी एस सोनवणे सर यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे महत्त्व, मराठी भाषा संस्कृती . याविषयी माहिती सांगितली.

मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम यांनी अध्यक्ष भाषण केले यातून त्यांनी विवा शिरवाडकर यांच्या साहित्यिक कार्यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सय्यद सर. पाडवी सर. जेडी जाधव सर. गोविंद सर. सौरव सर. सरोवर सर. अर्जुन सर. यांनी मोलाचे सहकार्य केले. अशाप्रकारे मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.

