
नांदगाव – ( प्रतिनिधी ) ज्ञानपीठ पारितोषिक विजेते संपूर्ण महाराष्ट्राचे विशेषता नाशिक जिल्ह्याचे भूषण कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून येथील लोकमान्य वाचनालयात साजरी करण्यात आली . ‘माय मराठी भाषेचे अमृताहुनी गोड असे वर्णन संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी केले आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये प्रत्येकाने मराठी भाषेचा वापर केल्यास प्रत्येक दिवसच मराठी भाषा गौरव दिन ठरेल’ असे प्रतिपादन संस्कृती रक्षक केंद्राचे संस्थापक दत्तराज छाजेड यांनी केले लोकमान्य वाचनालयातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माजी मुख्याध्यापक श्री प्रभाकर काकळीज हे होते याप्रसंगी कविवर्य कुसुमाग्रज, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते त्यात मराठी भाषेतील अभिजात साहित्यकृती, गाजलेली मराठी पुस्तके, व्यक्ती चरित्र,स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती इत्यादी विषयांवरील माहितीपर पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली होती नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिकाजी पाठक, शंकर सोनवणे, गोपाल बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले मराठी भाषा गौरव गीताने कार्यक्रमाची सांगता झाली
