
नांदगाव ( प्रतिनिधी).दिनांक 5 एप्रिल रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय बागूल सर व उपाध्यक्ष सौ.सरिता बागूल मॅम यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सर्व विद्यार्थी पार्टी वेअर लूक मध्ये गोड दिसत होती.विद्यार्थ्यांची स्पेशल लंच पार्टी नंतर ‘द जंगल बूक’ हा मुव्ही दाखविण्यासाठी स्पेशल तिकिट काऊंटर करण्यात आले होते. तिकिट घेऊन सर्वानी मुव्ही खूप एन्जॉय केला.विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देण्यासाठी 2024-25 ह्या वर्षी मा.मॅनेजमेंटने स्कूलमध्ये खूप स्पर्धाचे परिपूर्ण आयोजन भरवले होते.वाचन स्पर्धा,लेखन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा ईत्यादी. स्पर्धामध्ये स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग उत्तम नोंदविला.स्पर्धा मध्ये बक्षीसपात्र प्रत्येक विद्यार्थ्यांला आजच्या दिनी सन्मानचिन्ह मा.मॅनेजमेंटच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले होते.

शेवटी डान्स करून मा.मॅनेजमेंटच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आईसक्रीम देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ वर्षा नगे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पारपाडण्यासाठी शालेय शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय मेहनत घेतली.
