
माजी विद्यार्थिनी कु.शिवानी रामनाथ फडोळ हिचा सत्कार करतांना मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व सर्व मान्यवर प्राचार्य,उपप्राचार्या,पर्यवेक्षक सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे शाळेची माजी विद्यार्थिनी कु.शिवानी रामनाथ फडोळ हिची “दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी” म्हणुन नियुक्ती झाल्याबद्दल मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांच्या शुभहस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपिठावर अभिनव बालविकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले,उच्च माध्यमिक कमिटीचे अध्यक्ष पंडितराव पिंगळे,ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे,श्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस संजय फडोळ, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड,माजी मुख्याध्यापक शंकरराव पिंगळे,सत्कारार्थी कु.शिवानी रामनाथ फडोळ,रामनाथ फडोळ,उज्वला फडोळ,विष्णू फडोळ,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते,पर्यवेक्षक सुनिल पाटील उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविकात सर्व मान्यवर व कु.शिवानी हिचे शाब्दीक स्वागत केले.विद्यार्थ्यांना यापासुन प्रेरणा मिळावी म्हणुन कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.शाळेसाठी अतिशय अभिमानाची ही गोष्ट आहेत.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.कु.शिवानी फडोळ हिने उत्तुंग यश मिळविल्याबद्दल मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष रामदास पिंगळे व वैयक्तिक शंकरराव पिंगळे यांनी तिचा सत्कार केला.अभिनव स्कुल कमिटी अध्यक्ष निवृत्ती महाले यांची नाशिक जिल्हा फळबाग संघ ओझर या संस्थेवर संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच एन.एम.एम.एस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका योगिता कासार,सुनिता घोटेकर,अश्विनी टर्ले,चैताली मोगल,अर्चना दिघे तसेच कु.शिवानीचे गुरुवर्य प्रताप काळे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.कु.शिवानी फडोळ हिने सत्काराला उत्तर देतांना सांगितले की,आपण जर एखादे ध्येय समोर ठेऊन मनापासुन अभ्यास केला तर आपल्याला नक्की यश मिळते.शाळेने केलेला सत्कार हा मला नक्कीच प्रेरणादायी असणार आहे.तिने सर्व मान्यवर,शालेय परिवार तसेच त्यावेळेस शिकविणारे गुरुजन उपप्राचार्या विमल रायते,जेष्ठ शिक्षक प्रताप काळे,सोमेश्वर मुळाणे,योगीता कापडणीस या सर्वांचे आभार मानले.विद्यार्थ्यांनी यशासाठी कठोर परिश्रम करुन,भरपूर अभ्यास करावा व जीवनात यशस्वी व्हावे ही सदिच्छा व्यक्त केली.संजय फडोळ यांनी आपल्या मनोगतात कु.शिवानीच्या यशाचे कौतुक केले.तिला न्यायदानासारखे पवित्र कार्य करण्याची संधी मिळाली असुन,तिने संधीचे सोने करुन आपले नाव उज्वल करावे.शिवानीने अभ्यासात कठोर परिश्रम करुन महाराष्ट्रात चवथा क्रमांक प्राप्त केला असुन विद्यार्थ्यांनी यापासुन प्रेरणा घ्यावी असेही त्यांनी सांगितले.शंकरराव पिंगळे यांनी तिला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.निवृत्ती महाले यांनी कु.शिवानीचे यश म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा स्फुर्ती देणारे आहेत .आपल्या शाळेसाठी ही गौरवाची गोष्ट आहेत असेही त्यांनी सांगितले व सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांनी कु.शिवानीच्या उत्तुंग यशाचे भरभरुन कौतुक केले.विद्यार्थ्यांनी याप्रमाणेच आपले ध्येय डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करावा यश नक्कीच मिळते.मविप्र संस्था व मखमलाबादच्या विद्यालयाला कु.शिवानीचा सार्थ अभिमान आहे.तिला भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे यांनी केले.जेष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
