
आसरखेडे (. प्रतिनिधी ) ज्ञदि/२७ जनता विद्यालय आसरखेडे येथे कवीवर्य कुसूमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यालयात, मुख्याध्यापिका श्रीमती कापडनीस सी.आर.यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर ९वी च्या विद्यार्थ्यांनी “कुसुमाग्रज व साहीत्य” विषयावर कविता, कादंबरी आशय व शिरवाडकरांची नाटके सादर केली.

तसेच ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी, नवोदित कवींनी स्वरचित कवीचा सादर केल्या . शिवाय “मी आणि मराठी” विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात स्वरचित कविता वाचन स्पर्धेत १)सार्थक देशमाने प्रथम व २)नेत्रा चव्हाण द्वीतीय आली त्यास विद्यालयातर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद, विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले.
