
सिन्नर एसटी आगारात मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रमात बोलताना डॉ.श्यामसुंदर झळके,आगारप्रमुख हेमंत नेरकर,महामित्र दत्ता वायचळे,ज्येष्ठ पत्रकार सुभाष जाजू आदी..
सिन्नर (प्रतिनिधी)
मराठी भाषेला हजारो वर्षांची परंपरा असून तिचे जतन व संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि: शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर,महामित्र दत्ता वायचळे,ज्येष्ठ पत्रकार सुभाष जाजू, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बा.का.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या भाषणात डॉ.झळके यांनी सांगितले की,मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु प्रत्यक्ष आपण दैनंदिन जीवनात मराठीचा वापर करीत नसल्याची खंत व्यक्त केली

.मराठीभाषा गौरवदिन कार्यक्रमात बोलताना महामित्र दत्ता वायचळे
यावेळी महामित्र दत्ता वायचळे यांनी मराठी शाळा बंद पडत असून मराठीला उतरती कळा लागली असून आणि आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकण्यासाठी आग्रह धरला पाहिजे तरच मराठी भाषा अधिक समृद्ध होईल असा आशावाद व्यक्त केला.तर आगार प्रमुख हेमंत नेरकर तसेच निवृत्त मुख्याध्यापक बा.का.पाटील यांनी मराठी भाषेचा इतिहास व मराठी भाषेचे महत्व विषद केले. यावेळी बस स्थानक प्रमुख भरत शेळके, वाहतूक निरीक्षक जयंत चोपडे,गोरख साबळे,दिगंबर पुरी,विशाल पगार,नितीन वसमते,शरद नरोडे,कामिनी नागरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक सुनीता सानप यांनी केले तर आभार भरत शेळके यांनी मानले.
