
नांदगाव ( प्रतिनिधी ) नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही.जे.हायस्कूल,नांदगाव येथे आज शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.

या प्रसंगी मंचावर शाळेचे उपमुख्याध्यापक मा.डॉ.श्री.जोगेश्वर नांदूरकर ,जेष्ठ शिक्षक मा.श्री.विलास काकळीज ,ॲकेडमिक बोर्ड सदस्य मा.श्री.भास्कर मधे,शिक्षक प्रतिनिधी मा.श्री.प्रविण अहिरे,मा.श्री.राजेश भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली.प्रमुख पाहुण्यांच्या परिचयानंतर मा.डॉ.नांदुरकर सरांनी आपल्या प्रस्ताविकातून मराठी भाषा साजरा करण्यामागील हेतु स्पष्ट करुन कुसुमाग्रजांच्या समग्र साहित्याचा परिचय करून देत त्यांच्या जीवनातील अनेक सुरम्य आठवणींना उजाळा दिला.

यानंतर कु.दीपाली पवार व कु.सिद्धी मानकर ८-अ या विद्यार्थीनींनी आपल्या भाषणांमधून मराठी भाषा व कुसुमाग्रज यांच्याबद्दल माहिती सांगितली.कु.तनुष्का पांडे हिने कुसुमाग्रजांच्या निवडक कविता सादर केल्या.
कु.मृणाल बोरसे-९अ
कु.ऋतिका रंधे-७अ
कु.अक्षरा घोलप-८अ
या विद्यार्थिनींनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.
*या दिनाचे औचित्य साधत इयत्ता *८वी- अ च्या विद्यार्थिनींनी मराठी भाषेतील सुप्रसिद्ध साहित्यिकांवर आधारित तयार केलेल्या हस्तलिखितांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते *मा.श्री.राजेश भामरे यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषा संवर्धनाची गरज व महत्त्व स्पष्ट केले.

शाळेचे ज्येष्ठ शिक्षक *मा. श्री.विलास काकळीज यांनी मातृभाषा ही व्यक्त होण्यासाठी कशी महत्त्वाची आहे हे सांगितले तसेच मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करा असा संदेश दिला.आपल्या स्वरचित कविता सादर करून त्यांनी संपूर्ण वातावरण भारावून टाकले.* *कु.आसावरी गायकवाड हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय दर्जेदार व रसाळ वाणीत केले.
*कु.गिरीच्या वाघमारे हिने आभार मानले.फोटो व व्हिडिओ साठी मा.श्री.दाभाडे सर यांचे सहकार्य लाभले.*

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.ल.ना.ठाकरे ,उपमुख्याध्यापक मा.डॉ.श्री. जोगेश्वर नांदुरकर सर्व सहकारी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांची मोलाचे सहकार्य लाभले*कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला.
