
ओझर : (वार्ताहर) माधवराव बोरस्ते विद्यालयात वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी राजभाषा गौरवदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक वाटपाडे यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून साहित्याविषयी सखोल अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी विश्वसत्य कॉलेजचे राजीव देशमुख प्राची देशपांडे उप मुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे मराठी विषय शिक्षक महेंद्र डांगळे बाळासाहेब मोरे दादासाहेब सोनवणे आत्माराम शिंदे रेखा देशमाने कीर्ती बच्छाव मंगल सावंत लता आहेर मनीषा पवार रूपाली जाधव मेघा शेजवळ बच्छाव महेश पिंगळ मोहन क्षीरसागर आदी सेवक उपस्थित होते. तसेच नाशिक येथील शोभायात्रेत माधवराव बोरस्ते विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी कुसुमाग्रजांच्या विविध कविता काव्य सादर केले. फलक लेखन सविता पवार यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका मोनाली निकम यांनी केले. आभार नरेंद्र डेरले यांनी मानले.
