शाळेतील विद्यार्थिनींनी बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी यांची मुलाखत घेत साजरा केला मराठी राजभाषा दिन…..

नाशिक (प्रतिनिधी ) दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर काॉलेज,नाशिक.या शाळेत आज शुक्रवार,दि.२७/०२/२०२६ रोजी मराठी साहित्याचा मानदंड मराठीतील कवी श्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता बाजपेयी मॅडम व उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर यांच्या हस्ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम यांनी यावेळी मराठी भाषा लवचिक असून ती जशी वळवली जाते तशी वाकते.एकच शब्द पण त्यांच्या वेगळ्या उच्चाराने अर्थाचा विपर्यास होऊ शकतो.म्हणून मराठीतून संवाद साधतांना भाषा उच्चार हे चांगले असले पाहिजे.जेणेकरुन शब्दशक्तीच्या माध्यमातील वाच्यार्थ,लक्ष्यार्थ व व्यंगार्थामधील अर्थ बदलता कामा नये.तर त्यामध्ये सुसंगत अर्थ असावे,असे सांगून कार्यक्रमाचे चांगले नियोजन केल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे यांचे विशेष अभिनंदन करुन मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. राजेंद्र सोमवंशी सर यांच्या प्रकट मुलाखतीत विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्याला मायभाषेचा समृद्ध वारसा लाभला आहे,याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला पाहिजे.आपली मराठी भाषा अमृताशीही पैजा जिंकणारी आहे,हे ज्ञानेश्वर माउलींनी साडेसातशे वर्षांपूर्वी सांगून ठेवलं आहे.पुढे विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आज मराठी साहित्याच्या सर्व साहित्य -प्रकारांमध्ये बोली,बोली बोलणारा माणूस आणि या माणसांची बोली साहित्यात मिसळून लिहिणारे अनेक प्रतिभावंत बोलीप्रधान साहित्यनिर्मितीत जोरकस योगदान देत आहेत.आणि कवितेचे लेखन करतांना काय करावे? व कविता लेखनाकडे कसे वळालो,कविता कशी सुचते यांचे महत्त्व उदा.तून कथन केले.तसेच त्यांच्या स्वरचित कविता त्यांच्या खास आवाजातून सादर केल्या.कु.तृप्ती बागुल,कु.कृत्तिका बागुल ९-अ,कु.तनुष्का बिडगर,कु.कल्याणी लिलके ९-ब या विद्यार्थिनींनी प्रसिद्ध कवी व बालसाहित्यिक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर यांची खास मुलाखत घेतली.

विद्यार्थिनींनी प्रथमतः मुलाखतीच्या माध्यमातून २७,फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.काही विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे तर काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या कविता व माहिती सांगितली.
“मराठी भाषेला आपल्या साहित्याने समृध्द करणारे कविवर्य वि.वा.शिरवाडकर अशा या कुसुमाग्रज नावाचा अेक तारा साहित्य क्षितिजावर उगवला.तेजाची पूजा करीत तेजाने तळपत आकाशातील अेक स्वयंप्रकाशित तारा बनला.तोच तारा महाराष्ट्र भूमीचा देवदूत होऊन अवतरला.”.आणि याच कुसुमाग्रजाच्या साहित्यातून मराठी भाषा ही अधिकाधिक समृध्द होत गेली असे गौरवोद्गार काढले.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त शालेय ग्रंथालय व शाळेच्या अक्षरबाग परिसरात कुसुमाग्रज यांच्या साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन व आजच्या कार्यक्रमाचे प्रकट मुलाखतीचे संकल्पना गव्हर्निंग कौन्सिल सदस्या सौ.भारती चंद्रात्रे मॅडम यांनी व सौ.विद्या भानोसे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाशजी वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष श्री. प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी श्री.हेमंत बरकले ,शालेय समितीचे चेअरमन श्री. रमेश महाशब्दे साहेब, अधिक्षिका सौ.मीना वाळूंजे मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम,उपमुख्याध्यापक श्री.राजेंद्र सोमवंशी सर पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मॅडम,गव्हर्निग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे मॅडम,सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ईश्वरी झाडे व कु.ईश्वरी खरे ७-अ यांनी केले.आभार ग.कौ. सदस्य श्री . कैलास बागुल सर यांनी केले .फलकलेखन सौ.सायली मुळे मॅडम यांनी केले.
