
सिन्नर ( वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी. ) पाटोळे ता. सिन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘हिंद दी चादर’ दिन उत्साहात साजरा झाला.
‘हिंद दी चादर’ म्हणजेच हिदू धर्मरक्षक म्हणून ओळखले जाणारे गुरू तेगबहादूर यांच्या स्मरणार्थ विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजन सुनिता बर्वे, कैलास पवार, मिना सोनवणे, प्रतिभा पवार व सुनिता खताळे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक श्री. गोसावी यांनी गुरू तेगबहादूर यांच्या महान त्यागमय जीवनकार्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी सांगितले की, गुरू तेगबहादूर हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांनी धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढा देत त्यांनी मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या शौर्यामुळेच त्यांना ‘हिंद दी चादर’ ही उपाधी मिळाली.

यावेळी गुरू तेगबहादूर यांच्या जीवनावर आधारित गीताचे भावपूर्ण समूहगायन करण्यात आले. त्यानंतर वर्गनिहाय विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी याप्रमाणे
इयत्ता दुसरी – वक्तृत्व स्पर्धा
वेदा दत्तात्रय खताळे, संग्राम एकनाथ बरके
इयत्ता तिसरी – कविता लेखन स्पर्धा
वैष्णवी गणेश शिरसाठ, महेश हरिश्चंद्र खताळे, देवांश शंकर खताळे, आरोही प्रमोद गोरे
इयत्ता तिसरी – वक्तृत्व स्पर्धा
आरोळी सागर खताळे, ईश्वरी विनायक शिरसाठ, आराध्या दिनकर खताळे.
इयत्ता चौथी निबंध स्पर्धा आरोही माधव खताळे, ईश्वरी विनायक शिरसाठ.
इयत्ता पाचवी – चित्रकला स्पर्धा
आलिया मणियार, आराध्या गोरे, काजल खताळे, आर्यन पानसरे, ओंकार खताळे
इयत्ता सहावी – निबंध स्पर्धा
श्रुती आंधळे, ईश्वरी विकास आंधळे, स्वरांगी आंधळे, ईश्वरी श्रीराम आंधळे, श्रावणी खताळे
इयत्ता सातवी – वक्तृत्व स्पर्धा
प्रिया ज्ञानेश्वर खताळे, प्रिया राजेंद्र खताळे
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, त्याग व धार्मिक सहिष्णुतेचे मूल्य दृढ झाले. शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून बक्षीस वितरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे शाळेत प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
