
मुळडोंगरी (प्रतिनिधी). छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री एस जी राठोड साहेब व सचिव श्री सिद्धांत दादा राठोड तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण एस एस मॅडम व दिनविशेष समितीचे सर्व अध्यक्ष सचिव यांनी प्रतिमा पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण केला .याप्रसंगी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा परिचय सुंदर शब्दात व्यक्त केला. तसेच जुनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री बागल सर यांनी शिवजयंती व पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही डीजे लावून डान्स न करता आपल्या परिसरातील महिलांचा सन्मान व आदर करा महिला सुरक्षित कशा राहतील तसेच प्रत्येक घरातून मुलांवर उत्तम संस्कार करा . ज्यामुळे प्रत्येक घरामध्ये शिवबा जन्म घेतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श ,सामर्थ्य व पराक्रमाची व शौर्याची गाथा विद्यार्थ्यांसमोर सुंदर शब्दात व्यक्त केली. याप्रसंगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती बागुल मॅडम यांनी केले. तसेच याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
