
वेहळगाव ( प्रतिनिधी) दिनांक 24 व 25 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत नांदगाव तालुक्यातील जुनपाणीवस्ती आणि गावदरा शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनपाणीवस्ती मंगळणे या शाळेतील कु. यशस्वी राकेश आहिरे हिने स्पेलिंग बी स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. प्रणव अशोक बुरकुल या विद्यार्थ्याने मॅथ बी (पहिली दुसरी गट) जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला. या दोन्ही विद्यार्थांना शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवदास साखरे सर आणि उपशिक्षक श्री.राकेश आहिरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा या शाळेतील श्रेयश शिवदास साखरे या विद्यार्थ्याने मॅथ बी स्पर्धेत (पाचवी सहावी गट) जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.महेश थोरे सर आणि उपशिक्षक श्री.विलास सोनवणे सर यांनी परिश्रम घेतले.
वरील यशस्वी स्पर्धकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून या सर्व विद्यार्थ्यांना नांदगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्मा. श्री.नाईकवाडे सर, शिक्षण विस्तार अधिकारी सन्मा. श्री.योगेश थोरात सर आणि सन्मा. श्री.कांबरे सर, केंद्रप्रमुख श्री.दिलीप शिरसाठ सर, केंद्रशाळा मुख्या. श्री.गौतम पाटील सर यांचे मोलाचे पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन लाभले असून भविष्यात देखील येणाऱ्या सर्व स्पर्धांना हे सर्व विद्यार्थी असेच यश संपादन करतील अशी आशा व्यक्त केली आहे.विशेष करून हे विद्यार्थी लहान वस्तीवरील शाळेचे असल्यामुळे सर्व पंचक्रोशी मधून मुलांचे मार्गदर्शक शिक्षकांचे व मेहनत घेतलेल्या पालकांचे अभिनंदन केले जात आहे.
