नाशिक (प्रतिनिधी)– के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात दोन दिवसीय टेक्निकल महोत्सव ‘ई-मर्ज २०२६’ चे भव्य आयोजन २५ व २६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले.
या महोत्सवात विविध तांत्रिक स्पर्धा, प्रकल्प सादरीकरणे, पोस्टर प्रेझेंटेशन, कोडिंग स्पर्धा, टेक्निकल क्विझ, टेक टॉक तसेच विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देणारे उपक्रम घेण्यात आले. सुमारे २३० विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचे आणि तांत्रिक कौशल्यांचे उत्तम प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी अभियंता अपूर्वा जाखडी, NASA Space Educator व shree Engineering च्या CEO यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील नव्या संधींचा लाभ घेण्याचे आणि संशोधन व नवकल्पनांकडे लक्ष केंद्रित करण्याचे मार्गदर्शन केले.(प्र
समारोप समारंभात ADV. स्वरदा कबनूरकर, Whiteband ASOCIATES च्या व्यवस्थापकीय संचालक व सायबर लॉ कन्सल्टंट यांनी विद्यार्थ्यांना सायबर कायद्याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी डिजिटल युगातील सुरक्षितता आणि कायदेशीर जबाबदाऱ्या यांवर प्रकाश टाकला तसेच काही तांत्रिक प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले .
अक्षय स्टडी अब्रॉडचे संस्थापक श्री. अमित गोरे यांनी विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी तसेच विविध शिष्यवृत्तींबाबत मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, प्रामाणिकपणा आणि सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव पारितोषिक वितरण समारंभात करण्यात आला.
स्वागत भाषण आणि कार्यक्रमाचे उद्दिष्टे व आढावा डॉ. अर्चना बेंडाळे यांनी दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना या महोत्सवाचे शैक्षणिक आणि तांत्रिक महत्त्व स्पष्ट केले.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. समीर वाघ आणि सचिव प्रा. के. एस. बंदी यांनी मार्गदर्शन केले. तसेच सरस्वतीनगर कॅम्पस समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु सुकन्या पवार आणि कु.जान्हवी त्रिपाठी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मयूर उशिर आणि पवन मालानी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अनुराधा नांदुरकर आणि बी.सी.ए. विभागप्रमुख प्रा. विजयश्री बावा उपस्थित होते.
या महोत्सवात महाविद्यालयातील प्राध्यापक, मान्यवर माजी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. सर्व प्राध्यापकवर्गाने या कार्यक्रमाच्या भव्य यशासाठी परिश्रम घेतले. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन महोत्सव संस्मरणीय केला.
‘ई-मर्ज’ या नावाप्रमाणेच हा महोत्सव विविध कल्पना, कौशल्ये आणि आकांक्षा यांचे एकत्रीकरण ठरला. या दोन दिवसीय महोत्सवाने विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता आणि सहकार्य यांचा उत्तम संगम अनुभवायला मिळाला. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थीवर्ग यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ‘ई-मर्ज २०२६’ हा महोत्सव भव्य आणि यशस्वी ठरला.के. के. वाघ महाविद्यालयात ‘ई-मर्ज २०२६’ टेक्निकल महोत्सव उत्साहात साजरा
नाशिक – के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात दोन दिवसीय टेक्निकल महोत्सव ‘ई-मर्ज २०२६’ चे भव्य आयोजन २५ व २६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले.
या महोत्सवात विविध तांत्रिक स्पर्धा, प्रकल्प सादरीकरणे, पोस्टर प्रेझेंटेशन, कोडिंग स्पर्धा, टेक्निकल क्विझ, टेक टॉक तसेच विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देणारे उपक्रम घेण्यात आले. सुमारे २३० विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचे आणि तांत्रिक कौशल्यांचे उत्तम प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी अभियंता अपूर्वा जाखडी, NASA Space Educator व shree Engineering च्या CEO यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील नव्या संधींचा लाभ घेण्याचे आणि संशोधन व नवकल्पनांकडे लक्ष केंद्रित करण्याचे मार्गदर्शन केले.
समारोप समारंभात ADV. स्वरदा कबनूरकर, Whiteband ASOCIATES च्या व्यवस्थापकीय संचालक व सायबर लॉ कन्सल्टंट यांनी विद्यार्थ्यांना सायबर कायद्याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी डिजिटल युगातील सुरक्षितता आणि कायदेशीर जबाबदाऱ्या यांवर प्रकाश टाकला तसेच काही तांत्रिक प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले .
अक्षय स्टडी अब्रॉडचे संस्थापक श्री. अमित गोरे यांनी विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी तसेच विविध शिष्यवृत्तींबाबत मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, प्रामाणिकपणा आणि सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव पारितोषिक वितरण समारंभात करण्यात आला.
स्वागत भाषण आणि कार्यक्रमाचे उद्दिष्टे व आढावा डॉ. अर्चना बेंडाळे यांनी दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना या महोत्सवाचे शैक्षणिक आणि तांत्रिक महत्त्व स्पष्ट केले.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. समीर वाघ आणि सचिव प्रा. के. एस. बंदी यांनी मार्गदर्शन केले. तसेच सरस्वतीनगर कॅम्पस समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु सुकन्या पवार आणि कु.जान्हवी त्रिपाठी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मयूर उशिर आणि पवन मालानी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अनुराधा नांदुरकर आणि बी.सी.ए. विभागप्रमुख प्रा. विजयश्री बावा उपस्थित होते.
या महोत्सवात महाविद्यालयातील प्राध्यापक, मान्यवर माजी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. सर्व प्राध्यापकवर्गाने या कार्यक्रमाच्या भव्य यशासाठी परिश्रम घेतले. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन महोत्सव संस्मरणीय केला.
‘ई-मर्ज’ या नावाप्रमाणेच हा महोत्सव विविध कल्पना, कौशल्ये आणि आकांक्षा यांचे एकत्रीकरण ठरला. या दोन दिवसीय महोत्सवाने विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता आणि सहकार्य यांचा उत्तम संगम अनुभवायला मिळाला. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थीवर्ग यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ‘ई-मर्ज २०२६’ हा महोत्सव भव्य आणि यशस्वी ठरला.