
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४’ नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी, पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवीश्रेष्ठ श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी घेतला, तेव्हापासून २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी मातृभाषेचा वारसा पुढे चालवावा आणि मराठी भाषेचे शाश्वतपण टिकवावे या हेतूने जगभरात हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
★ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
