
.सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१९४ वा दिवस
भाषा ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून, ती भावना आणि विचारांना अभिव्यक्त करण्याचे सर्वात जिवंत माध्यम आहे. विचार आणि भाषा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक दुसऱ्याशिवाय शक्य नाही. शरीरासाठी जसे रक्त आवश्यक असते तसेच मनात उद्दीपित होणाऱ्या विचारांसाठी मातृभाषा आवश्यक असते. मातृभाषा हे शिक्षणाचे सर्वात प्रभावी व सुयोग्य माध्यम आहे. मातृभाषेचा वापर करणे हा खऱ्या राष्ट्रवादी शिक्षणाचा भाग आहे. ज्या भाषेचा तुम्ही दैनंदिन वापर करतात, त्याच भाषेतून केलेले संशोधन, मांडलेले सिध्दांत जगमान्य होतात. जे विचार मातृभाषेतून सुलभतेने पोहोचवता येतात, ते परकीय भाषेतून शक्य नाहीत. त्यामुळेच, जो शिक्षक मातृभाषेत ज्ञान देऊ शकत नाही, तो अज्ञानी मानला जावा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन ८ शके १९४७
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६
★ आमलकी एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ १९१२ मराठी भाषेतील जेष्ठ कवी, नाटककार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ “कुसुमाग्रज” यांचा जन्मदिन
★ १९३१ थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा स्मृतीदिन.
★ मराठी राजभाषा दिन…
★ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
