
नाशिकरोड:-(प्रतिनिधी )पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
चेतन पवन गीते, प्रतीक्षा चंद्रकांत शिरोळे, श्रीरंग नवनाथ मुंजे, अमन रमजान शेख यांनी परीक्षेत यश मिळविले. शिक्षिका श्रीमती एस.एल.वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासासोबत अतिरिक्त सराव केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार, शिक्षक-कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थ, पालकांनी अभिनंदन केले आहे.
