
नाशिक रोड (प्रतिनिधी )महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोड आयोजित “संवाद सृजनाशी – पर्व २, पुष्प ३३” यामध्ये नाशिक येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री.नरेश महाजन हे आपला साहित्य प्रवास आणि कुसुमाग्रजांच्या आठवणी उलगडून सांगणार आहेत.
कार्यक्रम : संवाद सृजनाशी – पर्व २, पुष्प ३३
दिनांक : शुक्रवार २७, फेब्रुवारी २०२६
वेळ : सायंकाळी ६.०० वाजता
स्थळ : ऋतुरंग सभागृह, दत्त मंदिर चौक, नाशिक रोड
संवाद सृजनाशी कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. त्यास जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
