
ओझर: (वार्ताहर) येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात वाटपाडे यांनी, सावरकरांचे जीवन म्हणजे अथांग सागरासारखे होते ‘ने मजशी ने परत मात्र भूमीला’ असं म्हणत ज्यांनी अंदमानच्या काळ्यापाण्याची शिक्षा भोगली पण देशाभिमान कधीही ढळू दिला नाही अशा थोर क्रांतिकारकाला मी वंदन करतो या शब्दात अदरांजली वाहिली. याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे, विश्वसत्य महाविद्यालयाचे प्राध्यापक राजेश देशमुख प्राची देशपांडे श्रीमती चौधरी क्रीडाशिक्षक प्रभाकर लवांड मनोरमा सोमवंशी महेंद्र डांगळे आदी सेवक उपस्थित होते. फलकलेखन सविता पवार मोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हंडोरे यांनी केले. आभार शिक्षक आत्माराम शिंदे यांनी मानले.
