
कासारी ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरतळावस्ती(कासारी)येथे श्रीयुत प्रमोदभाऊ इप्पर यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.बोरतळावस्ती शाळा ही १००% आदिवासीवस्ती असून कासारी गावापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे.बोरतळावस्ती शाळा ही वनपरिक्षेत्रात असून दुर्गम भागातील ही वस्ती आहे.येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना श्रीयुत प्रमोदभाऊ इप्पर यांनी विविध शैक्षणिक साहित्य दिल्याने विद्यार्थ्यांना विशेष आनंद झाला.यामध्ये शालेय स्कूल बॅग,मिक्स वही,कंपास,पेन,पेन्सिल,खोडरबर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीयुत तुळशीराम महादू सावंत,शिक्षणप्रेमी श्रीयुत धर्मा महादू सावंत,श्रीयुत संजयतात्या इप्पर,श्रीयुत सुनीलकाका उगले, श्रीयुत अरुणबापू इप्पर,श्रीयुत विश्वास शिंगाडे,श्रीयुत भिकन बोरसे,पोलीस पाटील श्रीयुत प्रभाकर शिंगाडे,हटकरवस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत आशुतोष हटकर सर,श्रीयुत अविनाश मुन्ना इप्पर,श्रीयुत अशोक इप्पर,श्रीयुत समाधान इप्पर,श्रीयुत रोहन सोनवणे,बोरतळावस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पावरा मॅडम,बोरतळावस्ती येथील सर्व ग्रामस्थ,शाळेतील विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पावरा मॅडम यांनी केले तर श्रीयुत आशुतोष हटकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
