
नवनाथ गायकर यांजकडुन
एखादयाची नियतीच अशी असते कि आभाळाएवढी थोर कामगिरी करुनही सतत ची उपेक्षा व तीव्र द्वेष च वाटयाला येतो. महान कार्य करुन अजरामर झाल्यानंतर ही विकृत सत्ताधारी दमन तंत्र वापरुन अन्याय करतात. उपेक्षा वाटयाला येते हे दुर्देव . स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या वाटयाला आजही नियती आलेली आहे.
‘ने परत ने मजसी मातृभुमीला,सागरा, प्राण तळमळला” या अजरामर देशप्रेमी गीताचे कवी व भारतीय स्वातंत्र्य समरागंणातील एक तळपता महान यौद्धा अशी या स्वातंत्र्य वीर सावरकर यांची ओळख आहे.
संपुर्ण जीवनच एका समर्पित भावनेने वाहुन घेणे ही सोपी गोष्ट नाही. ते ऐषोआरामात जगु शकले असते. प्रचंड संपत्ती ही कमावु शकले असते.पण हा सुखाचा मार्ग सोडुन हा देश इंग्रजी जोखडातुन मुक्त करणेसाठी त्यांनी व परिवाराने भोगलेल्या हाल अपेष्टा कल्पने पलिकडच्या आहे. त्यांच समग्र जीवन हाल अपेष्टा व दु;ख वेदनानीं भरलेलं आहे.
नाशिक शहराजवळील भगुर ही त्यांची जन्मभुमी. अत्यंत बुद्धीमान असणार्या सावरकरानीं तत्कालीन काळात बँरिस्टरची पदवी मिळवली.ठरवले असते तर इंग्रजी सरकारची उच्च पदाची नौकरी करत ते व त्यांचा परिवार सुखात जगु शकले असते. पण सावरकानीं हा स्वार्थी मार्ग न स्विकारता देश स्वतंत्र करण्यासाठी लढाईचा मार्ग स्विकारला.हया मार्गात हाल अपेष्टा होत्या.घरादाराची अक्षरश: राख रांगोळी झाली. ब्रिटिश अत्याचारात कुटुंबाची वाताहत झाली.संसाराची धुळधाण झाली.आणि एवढा महान त्याग करुनही स्वतंत्र भारतातही कित्येक वर्षे त्यांना उपेक्षाच भोगावी लागली.मृत्यु नंतरही विकृत मानसिकतेतुन राज्यकर्त्यानीं या महान क्रांतीकारकाचा द्वेष आणि उपेक्षाच केली. आजही कॉग्रेसी, कम्युनिष्ट विचारधारेचे लोक या महान वीराचा पराकोटीचा द्वेषच करतात हे दुर्दैवच आहे.
भारत हा वीराचां, यौद्ध्याचां देश आहे. पण अहिंसेच्या नपुंसक विचारानीं या देशाचं क्षात्रतेज मावळुन टाकलं.अहिंसेनं स्वातंत्र्य मिळालं, मिळवलं हा गैरसमज पसरवला गेला आणि जिथे जगात हिंसेच्या माध्यमातुनच स्वातंत्र्य लढा देणारे यौद्धे महापुरुष ठरले, तिथे भारतात हयाच मार्गाचा अवलंब करुन लढणारे चोर, लुटारु, दरोडेखोर व वाट चुकलेले ठरवले गेले ही केवढी वैचारीक दिवाळखोरी.
इथे भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवणार्या औलादी जन्माला आल्या तिथे स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या तावडीतुन कसे सुटावेत ?
शहिद भगतसिंह, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद , मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, सुभाष चंद्र बोस असे कितीतरी क्रांतिकारक सावरकरानीं घडवले.
१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम सावरकरानींच उजेडात आणला. महान भारतीय परंपरा व महान भारतीय वीराचां स्मृतीआड गेलेला इतिहास प्रखरपणे समाजासमोर आणला.
काळया पाण्याची यातनामय शिक्षा त्यांनी भोगली.
सावरकराचें जीवन चरित्र एक धगधगता इतिहास आहे.
या थोर भारतीय स्वातंत्र्य वीर सपुतास कोटी कोटी नमन.
लेखन- -नवनाथ गायकर
