
सिन्नर ( वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी:)
नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम, हिरावाडी, पंचवटी येथे पार पडलेल्या नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सिन्नर तालुक्याने ८९ गुणांची भक्कम कमाई करत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे.

२३ व २४ फेब्रुवारी रोजी दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील स्पर्धकांनी सर्व स्पर्धकांनी उल्लेखनीय लढत दिली. या यशामुळे सिन्नर तालुक्याच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्ता, मेहनत आणि जिद्दीचा ठसा जिल्हा स्पर्धेवर उमटवला असून तालुक्याचा झंझावात अनुभवायला मिळाला आहे.

स्पर्धा ,यशस्वी स्पर्धक, शाळा व क्रमांक याप्रमाणे
स्पेलिंग बी स्पर्धा
श्याम दशरथ वारुळे (पांगरी बुद्रुक) तृतीय, वेदांत संदीप अभंग (कहांडळडवाडी) द्वितीय, आसावरी ज्ञानेश्वर चत्तर (मानोरी) तृतीय, जयश्री हरक (शिवडे) तृतीय, प्रितम खैरे (चिंचोली) द्वितीय,
वक्तृत्व स्पर्धा (मोठा गट) आराध्या संदीप शेळके (शिवडे) द्वितीय.
कबड्डी (मुले)
वडगाव पिंगळा संघ द्वितीय.
बुद्धिबळ स्पर्धा (मोठा गट)
प्रथमेश समाधान जाधव (मुसळगाव) द्वितीय.
वैयक्तिक नृत्य
अस्मिता झनकर (झापवाडी) द्वितीय.
धावणे मुली स्पर्धा
आरोही सुनिल भारस्कर (कोनांबे) द्वितीय.
मॅथ बी स्पर्धा
आरोही परेश कचोळे (सुरेगाव) तृतीय, राज रामनाथ घोडसरे (बोगरवाडी) द्वितीय.
सर्व सहभागी व विजयी स्पर्धक व त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, गटशिक्षणाधिकारी
श्री राजेश डामसे , स्पर्धा समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विजय बागुल यांनी अभिनंदन केले आहे. सिन्नर तालुक्याच्या या यशामुळे शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात तालुक्याची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
