
आमदार हिरामण खोसकर
नाशिक जिल्हा प्रतिनिधी -नवनाथ गायकर यांजकडुन –
ईगतपुरी – त्रंबकेश्वर तालुक्यात कुंभपर्व, वाढवण बंदर, औदयोगिक वसाहत, सुरत राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आदीसह विविध प्रकल्पासाठी शेकडो एकर जमिनी संपादित करायचे काम द्रुतगतीने सुरु आहे. पण स्थानिकानां मारुन होत असलेला हा काय कामाचा ? तो कुणाच्या भल्याचा ? असा खरमरीत सवाल करत आमदार हिरामण खोसकर यांनी विधानसभेत डरकाळी फोडत स्थानिकाचीं व्यथा वेदना कळकळीने पटलावर मांडली.
विधानसभेचे अर्थ संकल्पीय अधिवेशन नुकतेच सुरु झाले असुन यात आमदार हिरामण खोसकर यांनी ईगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे स्थानिक शेतकर्याचें प्रश्न सभागृहात मांडले.
ईगतपुरी त्र्यंबकेश्वर हे दोन्ही तालुके आदिवासी आहेत. या शिवाय मुंबई , नाशिक शहरासह किमान निम्म्या महाराष्ट्राला पाणी पाजणारे पंधरा पेक्षा जास्त धरणे या दोन्ही तालुक्यात आहेत. याचबरोबर महामार्ग, लष्कर, वने, औदयोगिक वसाहत, रेल्वे आदि साठी यापुर्वीच लाखो हेक्टर सुपिक जमिनी संपादित झालेल्या आहेत.
आधीच विस्थापितांचा तालुका म्हणुन या दोन्ही तालुक्यातील स्थानिकांपुढे जगण्या मरण्याचा प्रश्न गंभीर आहे. उरलेल्या जमिनीमध्ये कशीबशी गुजराण करत असतानांच पुन्हा कुंभ पर्व विकासासह अनेकानेक विस्तारीत प्रकल्प तालुक्यामध्ये सुरु झाल्याने घरे दारे, व्यवसायासह जमिनी ही उध्वस्त होत आहे.
मात्र या जमिनीसाठी दिला जाणारा दर हास्यास्पद आहे. जिथे प्रति गुंठा चाळिस लाख रुपये इतका गगनाला भिडणारा भाव आहे त्या त्रंबकेश्वर मध्ये चाळिस हजार रुपये प्रति गुंठा हा दर अन्याय करणारा आहे.ही तफावत ही आमदार हिरामण खोसकर यांनी शासनाच्या लक्षात आणुन दिली .
महायुती चे हे सरकार कल्याणकारी सरकार असुन स्थानिकाचीं भावना व रास्त मागणी लक्षात घेऊन न्याय व्हावा अशी मागणी सरकार कडे केली आहे.
