
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१९३ वा दिवस
एखादा प्रचंड वृक्ष सुंदर व परिपूर्ण फल निर्माण करतो. ते फल पक्व होऊन जमिनीवर पडते, कुजते व त्यातून भावी वृक्षाचा अंकुर वर येतो. तो वृक्ष पहिल्या वृक्षाहून कदाचित अधिक प्रचंड रूप धारण करतो. या ज्या पतनाच्या कालखंडातून आपल्याला जावे लागले तो कालखंड आवश्यकच होता. या पतनातूनच भावी काळातील भारत जन्माला येत आहे. तो अंकुरित होत असून त्याची पहिली कोवळी पाने केव्हाच बाहेर पडली आहेत आणि भविष्यातील एक बलवान, विशाल, महाकाय व ऊर्ध्वमूल असा आश्वस्त वृक्ष येथे दिसू लागलेला आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन ७ शके १९४७
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २६ फेब्रुवारी २०२६
★ १९६६ क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, लेखक, प्रभावी वक्ते, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा स्मृतीदिन.
★ २००४ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा स्मृतीदिन.
★ २०१० ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी देऊन चालना देणारे समाजसुधारक, संघप्रचारक, संसद सदस्य, पद्मविभूषण चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा स्मृतीदिन.
