
हिमायतनगर (प्रतिनिधी )- हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर यात्रेनिमित्त राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायवाडी शाळेच्या संत सेवालाल लेझीम पथकाने प्राथमिक गटातून सर्वोत्तम सादरीकरण करून पाचवा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सामाजिक समतेचा संदेश देणारी शिवरायांचा दरबार ही नाटिका सादर करण्यात आली. हे नाटिका सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली.

या नाटिकेतून आपण सर्व जाती-धर्माच्या बंधनात बांधू पाहतोय या विषयाने सर्वांच्या हृदयाचा ठाव घेतला दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी याच संघाने इस्लापूर तालुका किनवट येथे झालेल्या लेझीम स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवत ७००१ रुपयाचे पारितोषिक पटकावले होते. या विजयाने पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायवाडीच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला.

या त्यांच्या यशाबद्दल हिमायतनगरचे गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले, कन्या बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील, सरसम बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी पंडितराव तळेगावकर, पोटा केंद्राचे केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक संजयजी जाणते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शामराव हरी आडे, ग्रामविकास अधिकारी आनंद कदम, सरपंच कांताबाई बरडे, उपसरपंच मधूकरराव राठोड, तसेच गावचे कारभारी, नायक, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक प्रसिद्ध साहित्यिक शंकर गच्चे, सहशिक्षक दत्ता मुसांडे, चंद्रकांत जाणते, लेझीम पथकाचे दिग्दर्शन करणाऱ्या प्रियंका आंबुरे मॕडम व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक, गावकरी यांच्यावतीने अभिनंदन केले जात आहे.
