
सिन्नर (प्रतिनिधी) संत गाडगे बाबा थोर समाजसुधारक व प्रबोधनकार होते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन महामित्र दत्ता वायचळे यांनी केले.येथील संत गाडगेबाबा जनसेवा मंडळाच्या आयोजित जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच संत गाडगेबाबा प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याची माहिती देताना सांगितले की,राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी देव मंदिरात नसून माणसात आहे, भुकेल्या माणसांना अन्न, तहानलेल्याना पाणी व निर्वस्त्र माणसांना कपडे द्या,मुलांचे शिक्षण करा अशी शिकवण देऊन समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला.यावेळी सुनील निकम,अनिल निकम,विजय निकम,बंडू जाधव,योगेश जाधव,गोकुळ देसाई,दशरथ देसाई,अविनाश निकम,अंजली निकम, चित्रा निकम,अनिता निकम,गायत्री निकम,सविता जाधव,रोहिणी निकम,सुनीता गवळी,यमुना निकम,अश्विनी शेजवळ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष अरुण निकम यांनी केले तर आभार माजी नगरसेवक भाऊशेठ जाधव यांनी मानले.
