
नाशिक ( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटी लिमिटेड नाशिक या सोसायटीच्या रिक्त जागेवर श्री.दत्तू हरिभाऊ पडोळ,सर यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीचे विद्यमान संचालक डॉक्टर संजय खंडेराव शिंदे हे नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर पडोळ सरांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष श्री. सुनील सखाराम काळे, उपाध्यक्ष श्री. सुनील सखाराम आहेर, मानद चिटणीस श्रीमती सुवर्णा दिनकर कोकाटे व कार्यकारी मंडळ उपस्थित होते.पडोळ यांच्या निवडीचे मविप्र सेवक सोसायटीच्या सभासदांनी स्वागत करुन आनंदोत्सव साजरा केला.
पडोळ सर यांच्या निवडीचे अभिनंदन
