
नांदगाव (प्रतिनिधी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपूर्ण विश्वात मोठ्या जल्लोषांनी उत्साहाने, आनंदाने, खेळीमेळीच्या वातावरणात व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विविध पद्धतीने साजरी केली जात असते. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही 14 एप्रिल रोजी “ज्ञान दिन” म्हणून साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने कार्यकारिणीची बैठक सारनाथ बुद्ध विहार येथे संपन्न झाली. यावेळी सदर बैठकीचे अध्यक्ष म्हणून आंबेडकरी जनतेचे ज्येष्ठ नेते नागसेन चव्हाण हे उपस्थित होते.

या बैठकीला बहुजन समाजातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात हजर होते. आंबेडकर अनुयायी सह बहुजन समाजातील तरुण युवा तसेच सर्वच उपस्थित बांधवांनी जयंती शांतप्रिय,आणि आनंदाने उत्साहाने साजरी करावी. कुठलेही गालबोट लागता कामा नये सर्वांनी एकोपाने एकत्रित राहून समितीला सहकार्य करावे. असे मार्गदर्शन यावेळी नांदगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश बनकर, माजी उपनगराध्यक्ष नितीन जाधव, तसेच मावळते जयंती अध्यक्ष सचिन निकम समाजसेवक राजेंद्र गांगुर्डे ॲड .सचिन साळवे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2026 साठी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी :- ॲड. सचिन साळवे उपाध्यक्ष :- सनी कावळे, दिपक अंभोरे, कार्याध्यक्षपदी:- सचिन संसारे, शंकर लगडे, खजिनदार पदी:- दत्तु जाधव, रोहित बागुल, शुभम देहाडे, यांची नियुक्ती झाली. मिरवणूक प्रमुख सागर अडकमोल, संतोष काकळीज, सजावट प्रमुख :- नितीन पगारे, पप्पु गरुड, सचिन निकम, बंडू जगताप सल्लागार पदी:- नागसेन चव्हाण, अरुण साळवे, राजेश बनकर, मिलींद खेडकर, अनिल जाधव, नितीन जाधव, मनोज चोपडे, विशाल निकम, विश्वास अहिरे, सचिन पगारे, सोनू जाधव, तानसेन जगताप, राजु गांगुर्डे, शोभाताई पगारे, कमलताई अहिरे, अक्काबाई सोनवणे, यांची निवड झाली. सदर निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्यासह सर्वांनी प. पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी घोषणा देत वंदन केले. यावेळी बैठकीचे सूत्रसंचालन मनोज चोपडे यांनी केले.
