
सिन्नर ( प्रतिनिधी) मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालय, सिन्नर येथे ‘हिंद दी चादर’ या प्रेरणादायी उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या प्रतिभेची प्रभावी छाप पाडली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माननीय मुख्याध्यापिका सुनीता कर्डिले यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा हेतू स्पष्ट करत विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा व संस्कारमूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

निबंध स्पर्धेत स्वरा गोरक्ष सोनवणे हिने प्रथम क्रमांक पटकावला, समृद्धी गणेश वारुळे हिने द्वितीय तर अवनी तयाप्पा लवटे हिने तृतीय क्रमांक मिळविला. वक्तृत्व स्पर्धेत आरोही योगेश ठोके हिने प्रथम क्रमांक संपादन केला. काव्य घोडे हिने द्वितीय, तर अद्विता ढोकळे हिने तृतीय क्रमांक मिळविला. चित्रकला स्पर्धेत नुझत हमीद खान जहागीरदार हिने प्रथम, अनुष्का निशाद हिने द्वितीय आणि उन्नती क्षत्रिय हिने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका सुनीता कर्डिले व पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धांसाठी संयुक्ता कुलकर्णी, सोनाली मोरे व कुसुम सोनवणे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून त्यांना योग्य दिशा दिली. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश प्राप्त केले.
कार्यक्रमास पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे, शिक्षकवृंद तसेच शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय व पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींचे कौतुक करत त्यांचे मनोबल वाढविले.
‘हिंद दी चादर’ उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये राष्ट्रभक्ती, सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीची जाणीव अधिक दृढ झाली असून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
