
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१९१ वा दिवस
प्रगतीची वा विकासाची पहिली अट स्वातंत्र्य हीच आहे. माणसाला विचार करण्याचे आणि ते विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक असते. तसेच त्याला आहार, विहार, पेहराव, आभूषणे, विवाह, सोहळे, समारंभे अशा विविध बाबतीत तो जोपर्यंत दुसऱ्याला कुठलीही क्षती वा हानी पोहोचू शकत नाही तोपर्यंत त्याला मुक्तपणे स्वातंत्र्य मिळायला हवे. जो बंधमुक्त होणार नाही तो कधीच पुढे जाऊ शकणार नाही. मानवाने सर्व बंधने तोडून टाकायला हवीत. त्याने स्वातंत्र्याच्या प्रकाशात यायला हवे. स्वातंत्र्याशिवाय कोणत्याही प्रकारची प्रगती वा विकास शक्य नाही. आमच्या पूर्वजांनी आम्हाला धार्मिक विषयात स्वातंत्र्य दिले म्हणून आम्हाला एक आश्चर्यकारक असा महान धर्म मिळाला आहे. आता मात्र त्याच धर्माने समाजाच्या पायात मोठ-मोठे साखळदंड अडकवले आहेत याचा परिणाम म्हणून आपला समाज आज एका शब्दात सांगायचे तर भयंकर आणि उग्र वृत्तीचा झाला आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन ५ शके १९४७
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २४ फेब्रुवारी २०२६
★ १६७० मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम शिवाजीराजे भोसले यांचा जन्मदिन.
★१६७४ मराठा साम्राज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे कोल्हापूर जवळील नेसरीच्या लढाईत सहा सहकार्यासह हौतात्म्य (वेडात मराठे वीर दौडले सात)
★ १९५२ कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
★ जागतिक मुद्रण दिन.
