
मूळडोंगरी ( प्रतिनिधी ) सरस्वती माध्यमिक विद्यालय, मूळडोंगरी, येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष माननीय श्री .एस जी राठोड साहेब, सचिव सिद्धांत दादा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस एस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी “जय भवानी,जय शिवाजी” अशी”शिवगर्जना” देत परिसर दणाणून सोडला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली व पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली.उपशिक्षिका श्रीमती पगार वाय. आर. यांनी मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील संस्कार, जिजाऊंचे मार्गदर्शन व त्यांच्या पराक्रमाच्या कथा विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता व देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण देशप्रेमाने भारावून टाकले तसेच आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष तसेच सचिव मुख्याध्यापिका , प्राध्यापक,सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
