
लासलगाव ( प्रतिनिधी ) नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. त्यानंतर प्रा.उज्वल शेलार यांनी गाडगे बाबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. गाडगे महाराजांनी स्वत: कृतीतून गांवा-गांवातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे झाडून स्वच्छ केली व रात्री त्याच गावातील गावकऱ्यांच्या मनातील अंधश्रध्देची, बुरसट रुढी, प्रधा परंपरेची घाण आपल्या विज्ञानवादी विचाराने किर्तनाच्या माध्यमातून साफ केली, रंजल्या-गांजल्यांची सेवा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर आणि सर्व रा.से.यो. स्वयंसेवकांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
