
मुळडोंगरी (प्रतिनिधी) सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी ता.नांदगाव जि.नाशिक येथे
आज विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक माननीय श्री एस. जी. राठोड साहेब, सचिव श्री सिद्धांत दादा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.बोरसे एस् एस् मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती मातेच्या व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर विद्यालयाचे उपशिक्षक श्री.बोरसे आर.टी.सर यांनी मनोगतातून राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांच्या कार्याबद्दल माहिती दिली .
या वेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष, सचिव , मुख्याध्यापिका,शिक्षक, शिक्षिका व शिक्षेकतर कर्मचारी,व विद्यार्थी उपस्थित होते.
