
ओझर: दि. 23 वार्ताहर
येथील मविप्र संचालित माधवराव बोरस्ते विद्यालयात कर्मवीर बाबुराव ठाकरे यांची पुण्यतिथी व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी कर्मवीर बाबुराव ठाकरे यांचे ‘मविप्र’ संस्थेतील सामाजिक बांधिलकी याबद्दल व संत गाडगे महाराज यांनी केलेल्या स्वच्छतेच्या कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.

शिक्षिका कीर्ती बच्छाव मंगल सावंत सरोज खालकर रेखा देशमाने शितल हंडोरे मोहन क्षीरसागर बाळासाहेब मोरे महेश पिंगळ महेंद्र डांगळे दादासाहेब सोनवणे आदी सेवक उपस्थित होते. फलक लेखन सविता पवार मोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले आभार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी मानले.
