
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१९० वा दिवस
भारताच्या एकतेत, अखंडतेत आणि संपन्नतेत कुठलीही बाधा निर्माण होऊ नये म्हणून सर्व भारतीयांनी एकाच जातीच्या सूत्रात अखंडपणे गोवले जायला हवे. या कामी आपण समर्थपणाने उभे राहिला हवे. आणि धर्माची साधना तसेच सर्व प्रकारच्या सामाजिक सुखसुविधा, अधिकार प्राप्त करण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्याची आपण प्रतिज्ञा करायला हवी. अर्थात आपले हे कार्य या विकृत विषमता जोपासणाऱ्या लोकांना कदापी मान्य होणार नाही; त्यामुळे हे काम वाटते तेवढे सोपे नाही; तरी पण हे उदात्त कार्य आपण करायला हवे. कारण रामकृष्णदेव ठाकुर यांनीच आपल्यावर या अतिशय कठीण कामाची जबाबदारी सोपवली आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन ४ शके १९४७
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ६/७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६
★ १८७६ समाजातील अज्ञान, अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा यांच्या विरुध्द किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे, ग्राम स्वच्छतेचे प्रवर्तक देबूजी झिंगराव जानोरकर ऊर्फ गाडगे महाराज यांचा जन्मदिन.
★ १९४७ आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना
★ १९५२ संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.
