
नाशिक (प्रतिनिधी ) बालसाहित्यातुन बालकाच्या मनात वेगळपण निर्माण करत असते. कारण साहित्य हे समाजमनाचा आरसा असतो असे प्रतिपादन वैशाली सुर्यवशी यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात २३१ पुष्प गुफताना वैशाली सुर्यवंशी जांभळीचा बंगला या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनंदा जराडे होत्या.
वैशाली सुर्यवंशी पुढे म्हणाल्या की, जोपर्यंत मुलांना त्याच्या क्षमतेएवढे पळता येत नाही तो पर्यंत मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही. जास्त पळु नको पडशील अशा बंधनामुळे मुले मागे पडतात.वेगवेगळ्या मुलाच्या कल्पना नाविण्यपुर्ण असतात. त्या समजुन घेतल्या की तो मिळणारा आनंद मोजता येणार नाही. दगड आणि बुलबुल याच्यातील संवाद आणि शिल्पकार तोच दगड घेऊन त्याला रुप देतो. तसे मुलांना आकार देऊन त्याच्यात निसर्गाविषयी कुतुहुल निर्माण करण्याची ताकद बालसाहित्यात असते. बालकावर निसर्गातील बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास करता आला पाहिजे. कारण बालसाहित्यातुन समाजाचा एक मुलांना वेगळंपण देत असते.मुलांना जोडण्यासाठी मुलाच्या भावविश्वात जावे लागते.शाश्वत मुल्य मुलांपर्यंत पोचण्याची गरज आहे.
यावेळी माधव पवार, एन. टी जाधव या भाग्यवान श्रोत्याना ग्रथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले.
आभार सोमनाथ साखरे यानी मानले तर सुरेश पवार यांनी सुत्रसंचालन केले.
दरम्यान येत्या मंगळवार २४ फेब्रुवारी रोजी स्मिता बनकर अरे वा खंरच की या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
