

लेखक:-डाॅ.गोरखनाथ देवरे
॥आत्मा मालिक गुरु ॐ गुरु ओम्॥ हरिपाठ अभंग चिंतन–
हरिपाठ अभंग-१
” देवाचिये द्वारी ऊभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या॥१॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी॥२॥ “देव म्हणजे काय?” ज्ञानेश्वर महराजांनी सांगीतलेल्या देवाचे खरे स्वरुप कसे आहे? देव म्हटला की सामान्य माणसाच्या डोळ्यापुढे एक मंदीर दिसते, त्यात एखाद्या देवाची मूर्ती। तोच देव ते मानतात। काही जण राम, कृष्ण, देवी, गणपती, ,,, हेच देव आहेत असे मानतात। परंतु, देव कसा आहे, देवाचे खरे स्वरुप कसे आहे? सर्व सिध्द-संत, ॠषि-मुनी, वेदादि शास्रे या सर्वांचा विचार केला असता देव, ईश्वर या प्रमाणे आहे—
“ईश्वर-देव म्हणजे काय? – आपण राम, कृष्ण, शंकर, गणपती, देवी यांची पूजा भक्ती करतो। हे सर्व देव, अवतार, सृष्टी उत्पन्न झाल्या नंतर चे आहेत. परंतु जेव्हा ही सृष्टी च नव्हती तेव्हा कोणता देव होता? आपण राम कृष्ण देवी इत्यादि अनेक देवांची पुजा करतो. या सर्व देवांची उत्पत्ती सृष्टी उत्पन्न झाल्यानंतर ची आपण ऐकतो. पण जेव्हा हे जगच नव्हते तेव्हा कोणता देव होता? याचे उत्तर अत्यंत प्राचीन वेद ऋग्वेद यात आहे। नासदीय सूक्त। भृगु ऋषि नी अनेक वर्ष तपस्या केली तेव्हा त्यांना ध्यानात समजले कि,
“यतो वा इमानि भूतानि जायन्ते, येन जातानि जीवन्ति। यत्प्रयन्त्यभिसंविशन्तीति। तद्विजिज्ञासस्व। तद् ब्रम्हेति॥ “तैत्तिरीय उपनिषद-१॥ ज्याच्या पासून हे संपूर्ण विश्व उत्पन्न होते, ज्याच्या साह्याने हे सर्व जगते, या विश्वाचे कार्य चालते, स्थिती व शेवटी ज्याच्यात हे विश्व लय पावते अशी शक्ती म्हणजे ईश्वर, देव, ब्रम्ह. जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारी अदृश्य शक्ती म्हणजे देव. (ब्रम्ह) ॥ जन्माद्यस्य यत: ॥ब्रम्हसूत्र॥१-१-२॥ सृष्टी उत्पत्तीचे सामर्थ्य ईश्वराने कोणत्याही संताला किंवा ऋषिंना दिले नाही. सृष्टी उत्पत्ती, स्थिती, लय हे ईश्वराचे विशेष कार्य आहे. जगद् व्यापारवर्ज्यम्, प्रकरणात् असन्निहितत्वात् च॥ ब्रम्हसूत्र॥४।४।१७॥
आनन्दो ब्रम्हेति व्यजानात्। आनन्दाध्द्येव खल्विमानि भूतानि जायन्ते। आनन्देन जातानि जीवन्ति। आनन्दं प्रयन्त्यभिसंविशन्तीति॥तैत्तिरीय-वल्ली-३, षष्ठ अनुवाक॥ [प्रयन्ति-इस लोक से प्रयाण करते हुये यद् अभिसंविशन्ति-जिसमे प्रवेश करते है।] ब्रम्ह नित्य आनंदरुप आहे. आनंद, सुख हेच ईश्वराचे स्वरुप आहे. काळाची उत्पत्ती सुध्दा ईश्वरा नंतर ची आहे. “अक्षरात् संजायते काल: ॥” असे एक वचन आहे। वरील रामकृष्णादि देव, एवढेच ईश्वराचे स्वरुप नाही. सृष्टी च्या अगोदर एकच देव होता, त्याने च सृष्टी उत्पन्न केली व तोच कायम आहे. त्याचे मूळ नाव ॐ असे आहे। वेद, उपनिषदे, भगवद् गीता या सर्व ग्रंथात त्याचेच वर्णन आहे. त्यालाच जाणणे आपला उद्देश आहे। शाश्वत सुख प्राप्तीचा हाच उपाय आहे. व्यासांनी ब्रम्हसूत्रात म्हटले आहे, ” अथातो ब्रम्हजिज्ञासा”॥ब्रसू-१।१।१॥ ब्रम्हाला जाणण्याची जिज्ञासा। कोणत्याही विषयाला जाणण्याची जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची तीव्र ईच्छा, ईश्वराला, आपल्या स्वस्वरुपाला जाणून घेण्याची ईच्छा ही अध्यात्माची पहिली पायरी आहे। देवी भागवतात सांगीतले आहे कि,
“संख्या चेद् रजसामस्ति। विश्वानां न कदाचन। देवी भागवत॥ “ पृथीवरचे धूलीकण मोजता येणे अशक्य आहे, पण एक वेळ ते मोजता येतील, परंतु आपल्या भोवती, वर, ईतके असंख्य ब्रम्हांड आहेत कि त्यांची संख्या मोजणे अशक्य आहे. अनंत ब्रम्हांड आहेत. या अनंत ब्रम्हांडांचा कर्ता म्हणजे ईश्वर. सामान्य मनुष्य ईश्वर भक्ती करतांना नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, श्रवण, ध्यान, दर्शन, पूजा इत्यादि करतो. परंतु, केनोपनिषदात एक गहन व सत्य उपदेश सांगितला आहे.
केनोपनिषदात गुरु-शिष्य संवाद आहे। शिष्य गुरुंना विचारतो,”गुरुजी, ब्रम्ह म्हणजे काय?” गुरु सांगतात,
यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते। तदेव ब्रम्ह त्वं विध्दि नेदं यदिदमुपसते॥ केनोपनिषद॥१।४॥ जे वाणीने ऊच्चारता येत नाही, परंतु, ज्याच्या शक्तीने वाचा बोलण्याचे काम करते तो ईश्वर आहे. हे लोक ज्याची उपासना (भजन कीर्तन, प्रवचन) करतात तो देव नाही. कारण, ईश्वर वाणीचा विषय नाही. “यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह। आनन्द ब्रम्हणो
विद्वान् न बिभेति कदाचन।।“ जेथून मनासह वाणी परत फिरते तो ईश्वर आहे. “यद्वाचा अनभ्युदितं येन वागभ्युद्यते”। तेवी तेणे तेजे। वाचेशी वाच्य सुजे। ते वाचा प्रकाशिजे। हे के आहे॥ अमृतानुभव-५-१५॥ यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतम्। तदेव ब्रम्ह त्वं विध्दि नेदं यदिदमुपासते॥१-५॥ सामान्य लोक मनाने ईश्वराचे चिंतन, ध्यान करतात. परंतु केनोपनिषदातील गुरु शिष्याला सांगतात. ज्याचे मनाने चिंतन करता येत नाही, जेथ पर्यंत मन च पोहोचू शकत नाही, जे मनाच्या पलिकडचे आहे. परंतु, ज्याच्या शक्तीने मन चिंतन इ. कार्य करते तो ईश्वर आहे. हे लोक जे करतात, तो ईश्वर नाही. यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति। तदेव ब्रम्ह त्वं विध्दि नेदं यदिदमुपासते ॥१-६॥ “जे डोळ्यांनी दिसत नाही परंतु ज्याच्या शक्ती मुळे डोळे सर्व काही पाहू शकतात तो देव आहे. हे लोक ज्याच्या कडे पहातात तो देव (ब्रम्ह) नाही. कारण परमेश्वर हा सामान्य इंद्रियांच्या पलिकडे आहे. त्याला पहाण्यासाठी आपल्याकडे अतिंद्रीय दृष्टी किंवा दिव्य दृष्टी पाहिजे. यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतम्॥ तदेव ब्रम्ह त्वं विध्दि नेदं यदिदमुपासते ॥१-७॥ जे कानांनी ऐकू येत नाही, परंतु, ज्याच्या शक्तीने कान ऐकू शकतात, ते ब्रम्ह आहे. यत् प्राणेन न प्राणिति येन प्राण: प्रणीयते। तदेव ब्रम्ह त्वं विध्दि नेदं यदिदमुपासते॥केनोपनिषद॥१-८॥ ज्याच्या शक्तीने प्राण, श्वास प्रश्वास कार्य करतात ते ब्रम्ह आहे. तुटेना फुटेना कदा देवराणा। चळेना ढळे ना कदा दैन्यवाणा। जया मानिला देव तो पूजीताहे। परि देव शोधोनी कोणी न पाहे॥ जगी पाहता देव कोट्यानुकोटी। जया मानली भक्ती जे तेची मोठी।१७८॥ तिन्ही लोक जेथुनी निर्माण झाले। तया देवरायासी कोणी न बोले। जगी थोरला देव तो चोरलासे, गुरुविण तो सर्वथा ही न दिसे॥१७९॥ (समर्थ रामदास स्वामी मनाचे श्लोक)
सर्वे वेदाः यत्पदमामनन्ति, तपांसि सर्वाणि च यद् वदन्ति। यदिच्छन्तो ब्रम्हचर्यं चरन्ति, तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्योमित्येतत्॥ कठोपनिषद-१-२-१५॥ सर्व वेद ज्याचे प्रतिपादन करतात, ज्याचे साठी तपश्चर्यादि साधने करतात, ब्रम्हचर्य इत्यादि व्रतांचे पालन करतात, ते पद तुला थोडक्यात सांगतो. त्याचे नाव ॐ असे आहे. एतध्द्येवाक्षरं ब्रम्ह एतध्द्येवाक्सरं परम्। एतध्द्येवाक्षरं ज्ञात्वा, यो यदिच्छति तस्य तत्॥ कठो-१-२-१६॥ हेच अक्षर ब्रम्ह आहे. हेच सर्वश्रेष्ठ ब्रम्ह आहे. या ब्रम्हाला जाणल्याने ज्याची जी ईच्छा असेल ती पूर्ण होते. (यमराज-नचिकेता संवाद) ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जयाजी स्वसंवेद्या। आत्मरुपा॥ ज्ञानेश्वरी॥१-१॥ नामा म्हणे नाम ओंकाराचे चे बीज। ब्रम्ह ते केवळ विटेवरी॥१॥ अपाणिपादो जवनो ग्रहिता, पश्यत्यचक्षुः स शृणोत्यकर्णः। स वेत्ति वेद्यं न तस्यास्ति वेत्ता। तमाहुरग्र् यं पुरुषं महान्तम्॥श्वेता ३-१९॥ जवनो-दूरगामी, वेगवान, ग्रहिता-गहण करणारा॥ बिनु पद चलई सुनई बिनु काना। करबिनु करम करई विधी नाना॥ तुलसीदास॥ परमेश्वराला हात नाहीत परंतु तो जगत उत्पत्ती चे मोठे कार्य करतो. त्याला पाय नाहीत पण त्याची गती अनंत आहे. परमेश्वराला डोळे नाहीत पण तो सर्व काही पाहू शकतो. तो सर्वांना जाणतो, पण त्याला जाणणारा कोणीच नाही॥
न तस्य कार्यं करणं च विद्यते। न तत्समश्चाभ्यधिकश्च दृश्यते॥ पराऽस्य शक्तिर्विविधै श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बल क्रिया च॥श्वेता-६-८॥ न तस्य कश्चित्पतिरस्ति लोके, न चेशिता, नैव च तस्य लिंगं ॥ स कारणं करणधिपाधिपो, न चास्य कश्चिज्जनिता न चाधिपः॥ श्वेता-६-९॥ ईश्वरासारखा सुध्दा कोणी नाही, तर मोठा कोण असेल? ईश्वराचा कोणीही पालक, शासक, पिता नाही. ईश्वरच सर्वांचा पिता, पालक, शासक आहे. अशब्दमस्पर्शमरुपमव्ययं, तथारसं नित्यमगन्धवच्च यत्। अनाद्यनन्तं महतः परं ध्रुवं, निचाय्य तन्मृत्युमुखात् प्रमुच्यते॥ कठो-१-३-१५॥ आपल्याकडे कोणत्याही सुखांचा किंवा जगातील कोणत्याही वस्तूचे ज्ञान होण्यासाठी फक्त ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये, मन एवढेच साधन आहे। यांचे अंतर्गत जे येईल त्याचेच ज्ञान आपल्याला होते। परंतु, ईश्वर हा शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध यांच्या पलिकडे आहे त्यामुळे आपण आपल्या सामान्य इंद्रियांनी ईश्वराला पाहू शकत नाही, व जाणू शकत नाही।।
अंगुष्ठमात्र: पुरुषो ज्योतिरिवाधूमक:। ईशानो भूतभव्यस्य स एवाद्य स उ श्व:॥कठो।२।१।१३॥ प्रत्येकाच्या हृदयात अंगठ्या एवढी सूर्यासारखी प्रकाशमान ज्योत असते. या ज्योतीला धूर नसतो व ऊष्णता ही नसते. हाच वर्तमान, भूत, भविष्य कालांचा ज्ञाता व शासनकर्ता हृदयस्थ ईश्वर आहे. सनत्कुमारांनी नारदाला केलेला ऊपदेश-“यो वै भूमा तत्सुखम्। न अल्पे सुखमस्ति। यत्र न अन्यत्पश्यति, न अन्यत् श्रुणोति, न अन्यत् विजानाति, स भूमा। अथ यत्र अन्यत् पश्यति, अन्यत् श्रुणोति, अन्यत् विजानाति, तत् अल्पम्। यो वै भूमा तत् अमृतम्। अथ यत् अल्पम्, तत् मर्त्यम्॥छांदोग्य उपनिषद॥ “पाद: अस्य विश्वा भूतानि, त्रिपाद अस्य अमृतं दिवि॥ सर्गस्थित्यंतकरणीं ब्रम्हविष्णुशिवात्मिकाम्। स संज्ञां याति भगवानेक: एव जनार्दन:॥ ॥ द्वे वाव ब्रम्हणो रुपे मूर्तं च अमूर्तं च॥ बृहदारण्यक॥३॥ सगुण निर्गुण तुज म्हणे वेद। तुका म्हणे भेद नाही नामी॥१॥
डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी पदी चालतो॥ जिव्हेने रस चाखितो,मधुरही वाचे आम्ही बोलतो॥ हाताने बहुसाल काम करीतो,विश्रांतीही घ्यावया। घेतो झोप सुखे फिरोनि ऊठतो, ही ईश्वराची दया॥१॥ अणोरणीयान्महतो महीयानात्मा गुहायां निहितोऽस्य जन्तोः। तमक्रतुं पश्यति वीतशोको, धातुः प्रसादान्महिमानमीशम् ॥श्वेता ३-२०॥ अणोरणिया थोकडा, तुका आकाशा एवढा। गिळूनी सांडीले कलेवर, भव भ्रमाचा विचार। सांडीली त्रिपुटी, दीप उजळला घटी। तुका म्हणे आता उरलो ऊपकारा पुरता॥१॥
आकाशे सर्वत्र वर्तावे। वायूने नावभरी उगे नसावे। पावके दहावे। वर्षावे जळे॥९-२८१॥ पर्वती बैसका न संडावी। समुद्री रेखा नोलांडावी। पृथ्वीया भूते वहावी। हे आज्ञा माझी॥२८२॥ म्या बोलविल्या वेद बोले। म्या चालविल्या सूर्य चाले। म्या हालविल्या प्राण हाले। जो जगाते चाळीता॥ ज्ञानेश्वरी॥९-२८३॥ जो ऐसा समर्थ। तो मी जगाचा नाथ॥ भयाद्स्याग्निस्तपति, भयात्तपति सूर्य:। भयादिंद्रश्च वायुश्च, मृत्युर्धावति पंचम:॥ या ईश्वराच्या भीतीने अग्नी तापतो, सूर्य जगाला प्रकाश देतो, त्याच्याच भीतीने इंद्र, वायु, आपापली कामे करतात। त्या ईश्वराच्या भीति ने मृत्यु सुध्दा धावतो। असे उपनिषदात ईश्वराचे स्वरुप सांगीतले आहे।
भिद्यते हृदयग्रन्थिश्च्छिद्यन्ते सर्व संशयः। क्षीयन्ते चास्य कर्माणि, तस्मिन्दृष्टे परावरे॥ मुंडकोपनिषद-२-८॥ ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन, अनूभूति झाल्यावर सर्व हृदयग्रंथींचा भेद होतो, सर्व संशय नष्ट होतात, सर्व कर्मे भस्म होतात।
न चक्षुषा गृह्यते नापि वाचा, नान्यैर्देवैस्तपसा कर्मणा वा॥ ज्ञानप्रसादात् विशुध्दसत्वतस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमानः॥ मुंडकोपनिषद ३-१-८॥ हा ईश्वर डोळ्यांनी दिसत नाही, वाणीने ग्रहण करता येत नाही, शब्दांनी सांगता येत नाही। जशी साखरेची चव अनुभवता येते, पण शब्दांनी सांगता येत नाही।
कोणत्याही कर्माने, तपाने, प्राप्त होत नाही, दिसत नाही। परंतु, जेव्हा ज्ञान प्रसादाने सर्व इंद्रिये शुध्द होतात तेव्हा तो ध्यानात प्रत्यक्ष प्रकट होतो। मुंडकोपनिषद मे ऐसा कहा गया है: ‘न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यैर्देवैस्तपसा कर्मणा वा। ज्ञानप्रसादेन विशुध्दसत्त्वस्ततस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमान:॥३-१-८॥‘॥‘ “परमात्मा न तो नेत्र, वाणी या इंद्रियों द्वारा ही ग्रहण किया जा सकता है और न तपस्या या कर्म द्वारा ही जाना जा सकता है। किंतु जब ज्ञान के प्रकाश द्वारा मन शुध्द हो जाता है, तो ध्यान मे उस परम सत्ता का दर्शन प्राप्त हो सकता है।” [सिध्दयोग दीक्षा-पेज-२६]
एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते। दृश्यते त्वग्रया बुध्द्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः॥१-३-१२॥ कठो॥ इयं विसृष्टिर्यत आ बभूव यदि वा दधे यदि वा न। योऽस्याध्यक्ष: परमे व्योमन्त्सो अङ्ग वेद यदि वा न वेद॥ ऋग्वेद मंत्र १०-२९-७॥ हे अङ्ग (मनुष्या) ज्यापासून ही विविध सृष्टी उत्पन्न झाली आहे, जो तिचे धारण करतो, व जो तिचा प्रलय ही करतो, तसेच जो या सृष्टीचा स्वामी आहे, व ज्या व्यापकामध्ये हे सर्व जगत् उत्पत्ति, स्थिति व लय यांना प्राप्त होते, तो च परमात्मा आहे असे जाण। व दुसर्या कोणाला ही सृष्टीकर्ता मानू नको। जगद् गुरु शंकराचार्य आत्मबोध या ग्रंथात वर्णन करतात, “यल्लाभान्नापरो लाभो, यत्सुखान्नापरं सुखं। यज्ज्ञानान्नापरं ज्ञानं, तद् ब्रम्हेत्यवधारयेत्॥” ज्या लाभा पेक्षा जगात मोठा कोणताही लाभ नाही, ज्या सुखा पेक्षा जगात मोठे सुख नाही। ज्या ज्ञानापेक्षा मोठे ज्ञान नाही तो परमेश्वर आहे. सूर्याचंद्रमसौ धाता यथा पूर्वमकल्पयत। दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमथो स्व:॥ऋग्वेद मंत्र १०-१९०-३॥ ईश्वराने ज्याप्रमाणे पूर्वीच्या कल्पात सूर्य, चंद्र, विद्युत, पृथ्वी, अंतरादि पदार्थ बनविले होते तसेच या मध्ये ही त्याने बनविले आहेत, व पुढे ही असेच राहील। ओम् खं ब्रम्ह ॥यजुर्वेद ४०-१७॥ अवति इति ओम्। रक्षण करणारा तो ओम्. आकाशमिव व्यापकत्वात् खं। आकाशा प्रमाणे व्यापक आहे तो खं. सर्वेभ्यो बृहत्वात् ब्रम्ह। सर्वा हून तो मोठा आहे म्हणुन ब्रम्ह. स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणमस्नाविरं शुध्दमपापविध्दम्। कविर्मनीषी परिभू: स्वयम्भूर्याथातथ्यतोऽर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्य: समाभ्य:॥यजुर्वेद॥४०-८॥ तो ईश्वर [पर्यगात्] सर्वत्र व्यापक व अनंत बलवान आहे। तो शुध्द, सर्वज्ञ, सर्वान्तर्यामी, मननशील, सर्वांवर विराजमान, स्वयंभू, सनातन, स्वयंसिध्द, असा परमेश्वर अनादि काळापासून आपल्या अनादि, सनातन जीव रुपी प्रजेला वेद द्वारा संपूर्ण ज्ञानाचा बोध यथावत करीत आहे. [ददामि बुध्दियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥गीता॥]. तो “अकायं” शरीर धारण करीत नाही. तो अजन्मा आहे. त्याच्या मध्ये व्रण किंवा छिद्र नाही. तो नाडीशिरस्नायूंच्या बंधनात पडत नाही. अस्नाविरम्। तो कधीही पापाचरण करीत नाही. त्याला क्लेश, दु:ख, अज्ञान कधीही होत नाही. भगवद् गीतेतील विश्वरुप दर्शन- ईश्वराचे स्वरुप।
“दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुथिता। यदि भा: सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मन: ॥११-१२॥” आकाशात एकाच वेळी हजारो सूर्य प्रकट झाले तर त्यांचा प्रकाश हा त्या विश्वरुपाच्या एका, किंवा किंचित् अंशा इतका असेल. सर्वत: पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम्। सर्वत: श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति॥१३-१३॥ त्याला सर्व बाजूंनी हात पाय आहेत, सर्वत: श्रुतिमत् ज्याला सर्व बाजूंनी श्रवणेंद्रिये आहेत, तत् ते ज्ञेय, या प्राणी समूहात सर्व व्यापून ते तत्व राहाते। [भगवद्गीता]
सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम्। असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च॥ १३-१४॥ त्यात सर्व इंद्रियांच्या गुणांचा भास होणारा असून वस्तुत: त्याला कोणतेच इंद्रिय नाही। ते सर्वा पासून असक्त असून सर्व भूतांचे धारण पोषण करणारे आहे। ते निर्गुण आहे व गुणभोक्ते ही आहे।
बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च। सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्॥ १३-१५॥ ते ब्रह्म सर्व सृष्ट पदार्थांच्या बाहेर आहे व आत ही आहे। ते अचल आहे आणि चल ही आहे। ते सूक्ष्म असल्यामुळे जाणण्या ला दुष्कर आहे। तसेच ते दूर असून जव्ळ ही आहे।
अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम्। भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च॥ १३-१६॥ ते ब्रह्म सर्वत्र अखंड असून ही सर्व प्राण्यांच्या रुपात विभागल्या सारखे दिसते। ते भूतमात्रांचे धारण पोषण करणारे, ग्रासणारे आणि उत्पत्ती ही करणारे आहे। [भगवद्गीता]
ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमस: परमुच्चते। ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्टितम्॥१३-१७॥ ते ब्रह्म तेजांचे ही तेज असून अंधाराच्या अत्यंत पलीकडचे आहे असे म्हटले जाते। ते ज्ञानरुप, व ज्ञेयरुप ज्ञानानेच कळणारे असून सर्वांच्या हृदयात तेच अधिष्ठीत आहे।
प्रकृतिं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि। विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान्॥१३-१९॥ उपद्रष्टाऽनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वर:। परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुष: पर:॥१३-२२॥ क्षेत्रज्ञ पुरुष हा प्रकृती हून अगदी वेगळा, व अत्यंत श्रेष्ठ असा परमात्माच आहे। तो या क्षेत्र रुपी देहात , या प्रकृतीचे खेळ जवळ राहून पाहाणारा, त्यांना अनुमोदन देणारा, देहाचे पोषण करणारा, सुखदु:खांचे अनुभव घेणारा, किंबहुना या प्रकृती कृत खेळाचा सूत्रधार असा धरला जातो। [भगवद्गीता]
ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना। अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे॥१३-२४॥ समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्वविनश्यन्तं य: पश्यति स पश्यति॥१३-२७॥ परमेश्वर सर्व भूतांच्या अंतरी सारखा राहणारा, व सर्व भूते नाश पावली तरी नाश न पावणारा असा आहे। असे जो पाहातो, त्याने खरे तत्व ओळखले आहे म्हणावयाचे। समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्॥१३-२८॥ कारण, जो पुरुष ईश्वर सर्वत्र सारखाच भरलेला आहे असे समबुध्दीने पाहातो, तो आत्मघातकी होत नाही म्हणून उत्तम गतीला जातो। “स एष: पुर्वेषामपि गुरु: कालेनानवच्छेदात्॥१-२६॥“ ईश्वर सर्व गुरुंचा ही गुरु आहे। पतंजल योगसूत्र-। कारण, काळासहित सर्वांच्या अगोदर ईश्वरच आहे। ईश्वरच सर्वांचे मूळ आहे।
पडे खाली जे नभातून पाणी।जसे सागरातेच जाते मिळोनी। नमस्कार कोणाही देवास केला। तरी अंती तो पोचतो केशवाला॥१॥ आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं। सर्व देव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति॥१॥
