
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१८९ वा दिवस
माणसाचे अंतिम ध्येय सुख नसून ज्ञान आहे. कारण सुख आणि आनंदाचा एक ना एक दिवस शेवटच होत असतो. सुख हेच परम ध्येय आहे असे समजणे ही माणसाची मोठी घोडचूक असते. जगातील सगळ्या दुःखांचे मूळ हेच आहे की मानवाने अज्ञानामुळेच सुख हेच त्याचे अंतिम ध्येय मानले आहे, पण काही काळानंतर माणसाला हा बोध होतो की ज्याकडे तो जात आहे ते सुख नसून ज्ञान आहे. सुख आणि दुःख दोघेही महान शिक्षक आहेत आणि जेवढे ज्ञान त्याला सुखाकडून मिळते तेवढेच दुःखाकडूनही मिळत असते. ज्याप्रमाणे चकमक दगडात अग्नी साठलेला असतो त्याचप्रमाणे मानवाच्या मनात ज्ञान राहत असते. फक्त घर्षणानंतर हा ज्ञानाग्नी प्रकाशित होत असतो.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन ३ शके १९४७
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६
★ महर्षी याज्ञवल्क्य जयंती
★ १८५७ स्काउट चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिन
★ १९४४ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा स्मृतीदिन
★ १९५८ स्वातंत्र्य चळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा स्मृतीदिन
★ आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस.
