
मोहाडी : (बातमीदार) मविप्र संचलित रावसाहेब थोरात विद्यालय या परीक्षा केंद्र क्रमांक1180 केंद्रावर दहावीची परीक्षा सुरळीत पणे सुरू झाली असून सर्व विद्यार्थ्यांना मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. केंद्र संचालक प्राचार्य शिवाजी शिंदे व उपकेंद्र संचालक प्रदीप जाधव उपमुख्याध्यापक गोसावी ए.आर.पर्यवेक्षक पठाडे एस. एस. सह सर्व शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेस शुभेच्छा दिल्या. विद्यालयात मोहाडी सह जानोरी आंबेदिंडोरी कोराटे पालखेड लोखंडेवाडी जोपुळ ढकांबे तील एकूण 612 विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यांची बैठक व्यवस्था 26 ब्लॉक मध्ये सुयोग्य पद्धतीत केली असून 46 सीसी टीवी ची नजर असणार आहेत स्टेशनरी पर्यवेक्षक भवर ज्ञानेश्वर आणि वाळके मंगेश लिपिक श्रीम वैद्य पल्लवी व संजय भुजबळ व सहकारी हे परीक्षेचे कामकाज पाहत आहेत. परीक्षेचे नियोजन शिस्तबद्ध सुरळीत पार पाडावे यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असल्याची केंद्र संचालक मुख्याध्यापक शिवाजी शिंदे यांनी सांगितले यावेळी मुलांनी मोकळ्या वातावरण कॉपीमुक्त तणावमुक्त परीक्षेस सामोरे जावे वेळेचे योग्य नियोजन करून पेपर लिहावा अशी उपस्थितांनी सूचना दिल्यात
