
OUR FRIENDSHIPS
या थिमव्दारे लॉर्ड बेडन पॉवेल यांना अभिवादन..

स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेलव लेडी बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस २२ फेब्रुवारी चिंतन दिन म्हणून साजरा केला जातो, या वर्षी हा दिवस शंभरावा चिंतन दिन आहे, या दिनानिमित्त वाय.डी.बिटको हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नाशिक या शाळेत कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाची थीम ‘OUR FRIENDSHIP ‘देण्यात आलेली होती, आज आम्ही ही थीम मैदानांवर मुलींद्वारे अवर फ्रेंडशिप या लोगोमध्ये तयार करून माननीय लॉर्ड बेडन पॉवेल यांना मानवंदना दिली.

या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेले आमच्या शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री सोमवंशी सर, शाळेच्या पर्यवेक्षिका माननीय सौ गवारे मॅडम, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य माननीय श्री बागुल सर माननीय चंद्रात्रे मॅडम उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व दीप प्रज्वलनाने पूजन केले, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘दया कर दान भक्ती का’ ही प्रार्थना व ‘सुबह सवेरे लेकर प्रभू का नाम’ या प्रार्थनेने करण्यात आली,
यावेळी विद्यार्थिनींनी लॉर्ड बेडन पॉवेल यांचे विषयीची माहिती व गाईडचे महत्त्व सांगितले, मार्गदर्शनपर भाषणामध्ये माननीय श्री सोमवंशी सर यांनी आपले विचार मांडले यावेळी

विद्यार्थिनींना उदबोधन पर मार्गदर्शन करताना मैत्री, सद्भावना,मानवता आणि सेवा यांचा समावेश आपल्या जीवनात करून वैश्विक बंधुभाव जोपासावा व स्काऊट गाईड ची चळवळ अधिक आनंददायी करावी अशी भावना व्यक्त केली.
कु.अव्दिका शिरसाठ व कु.आराध्या मुसळे यांनी लॉर्ड बेडन पॉवेल यांची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाईड प्रमुख सौ. शिंदे यांनी केले, फलक लेखन श्रीमती सायली मुळे यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्काऊट -गाईड शिक्षक बंधू भगिनी ,चतुर्थ कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे आभार श्री. विजय सरोदे सर यांनी मानले.
