
नाशिक जिल्हा प्रतिनिधी-नवनाथ गायकर यांजकडुन –
आहुर्ली, ता.ईगतपुरी (नाशिक) येथील प्रसिद्ध लेखक नवनाथ अर्जुन पाटिल गायकर यांच्या "खुराडा" या कथेस ईगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे वतीने पारितोषिक जाहिर झाले आहे.
गाव खेडयात आख्खं आयुष्य घालवणारी खेडवळ वृद्ध महिला शहरात नौकरीस लागलेल्या लेकाकडे रहावयास जाते.पण मोकळया वातावरणात वावरणार्या त्या महिलेची इवल्याशा फ्लँट मध्ये घुसमट होते व शेवटी ती या खुराडयातुन एकटीच गावाकडे परतते अशा आशयाची ही दमदार कथा आहे.
लेखक नवनाथ गायकर यांच्या अनेक कथानां यापुर्वी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
यात ‘मार्मिक साप्ताहिक’, सार्व. वाचनालय नाशिक कडुन दोनदा, प्रतिभा साहित्य संघ अकोट, जि.अकोला असे विविध ठिकाणी प्रथम क्रंमाकाचे पारितोषिके प्राप्त झालेली आहेत.
गायकर यांच्या या घवघवीत यशाचे साहित्यिक व सामाजिक वर्तुळातुन अनेकानीं अभिनंदन केले.
हया पारितोषिकाचे वितरण ऱवि.दि.२२ फेब्रु.रोजी नाशिक येथे आयोजित साहित्य संमेलनात मान्यवराचें हस्ते होणार आहे.
