
सिन्नर (प्रतिनिधी)२० फेब्रुवारी २०२६ काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की,
महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावशाली पुरोगामी विचारवंत, कम्युनिस्ट कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे होते.त्यांनी कष्टकरी, शेतमजूर आणि महिलांच्या हक्कांसाठी अनेक लढे उभारले जातीयवाद विरोधी: अंधश्रद्धा आणि जातीयवादी संघटनांविरोधात संघर्ष केला.त्यांनी लेखन आणि विचार अनेक पुस्तकांमधून खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न केले. “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेचा राजा ही प्रतिमा मांडली आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष विचारांवर प्रकाश टाकला. “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाचे ते लेखक होते

. पुरोगामी एक उत्तम वक्ते आणि लोकनेते म्हणून परिचित होते. ज्यांनी आयुष्यभर पुरोगामी विचारांचा प्रसार केला. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी समाज कंटकांकडून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान २० फेब्रुवारी २०१५ रोजी झाला. त्यांची हत्या झाली त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करत आहे. तरी लवकरात लवकर त्या आरोपींना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी महामित्र दत्ता वायचळे यांनी केली.
अशा महान “काॅम्रेड गोविंद पानसरे यांना क्रांतिकारी लाल सलाम अमर रहे अमर रहे गोविंद पानसरे अमर रहे” अशी घोषणा देण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश वाकचौरे सर यांनी केले. व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले. तर आभार रुपेश मुठे यांनी मांडले.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित महामित्र दत्ता वायचळे, आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सह संस्थापक विजय मुठे, मा.नगरसेवक रुपेशभाऊ मुठे, गणेश वाकचौरे, आकाश सानप, शाम डांगे, प्रभाकर उगले, संजय गोळेसर, चेतन शेटे, रमेश आडे, स्वप्निल सोनवणे, विजय वाजे, अथर्व वरंदळ, ज्ञानेश्वर वरंदळ, प्रकाश गुंजाळ, योगेश मोरे, रोहित मुठे, किरण मुठे, योगेश सोनवणे आदि. उपस्थित होते.
