
चापडगाव ( प्रतिनिधी ) शेवगाव तालुक्यातील शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित चापडगाव जिल्हा परिषद शाळेच्या बाल कलाकारांनी स्फूर्ती गीतांसह सांस्कृतिक कार्यकमांसह शिक्षक गवाजी बळीद लिखित व दिग्दर्शित मोबाईल वापराच्या तोट्यांवर आधारित व जीवनात पुस्तकांचे महत्त्व सांगणारी हास्याचे फवारे उडवत आनंदाने नाचा ही प्रबोधनपर विनोदी नाटीका सादर करत प्रेक्षकांच्या धम्माल टाळ्यांची दाद मिळविली . मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे डोके बुद्धि कान वर्तन यावर होणारे विपरित परिणाम या नाटीकेत अत्यंत रंजक पद्धतीने भूमिका करून बाजारतळातील रंगमंचावर आपल्या कलात्मकतेची चुणूक दाखवून प्रेक्षकांना हास्यरसात डुंबविले . “आनंदाने नाचा “या नाटीकेत प्रमुख भूमिकेत रुद्राज पातकळसह शिवम गायकवाड श्रुती जगताप तीर्थराज भिसे स्वरा गोरे आदिराज शिंदे गायत्री दिवटे समर्थ पोपळे देविका गोरे प्रांजल वाल्हेकर ईश्वरी नाईक सोहम जाधव तेजस पातकळ समर्थ भिसे शिवानी डाके वेदिका नेहाले तनुजा गोरे पायल कामटे यांनी बहारदार अभिनय केला नृत्य दिग्दर्शन श्रीम मंजुश्री खंडागळे यांनी केले.

ऐतिहासिक नाटीका ” आधि लगीन कोंढाण्याचं ” नाटिकेत प्रमुख भूमिकेत अनिकेत बीडे हिंदवी मडके भक्ती गोरे वेदिका नेहाले सूरज जगताप दत्तु निर्मळ समर्थ भिसे रोहित हराळकर सोहम शेकडे असद शेख समर्थ पातकळ कैवल्य गायकवाड शिवम गायकवाड समर्थ मडके तेजस पातकळ
तीर्थराज भिसे यांच्या दमदार संवादफेकीने आणि लढाईच्या प्रसंगाने प्रेक्षकांना बालकलाकारांनी खिळवून ठेवत टाळ्यांचा कडकडाटात व हरहर महादेवच्या जयघोषात तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पाहिली आणि देशभक्तीने उर दाटून आले . नाट्याचे दिग्दर्शन व प्रभावी संवाद लेखन शिक्षक तथा लेखक गवाजी बळीद यांनी केले .

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जेष्ठ शिक्षक दादासाहेब चव्हाण बाबासाहेब हरदास रविंद्र घनवट कारभारी नाचन मजुश्री खडागळे-नाचन यांनी लढाईसाठी साहित्य निर्मिती करून मोलाची भर घातली. शिवजयंती निमित्त जिल्हा परिषद शाळेच्या रगमंचावर सुमारे ४५ हजार रुपये खर्चून भक्कम छत प्रदान करून शाळेच्या वैभवात भर घातल्या बद्दल मा.गंगाधर सुखदेव गोरे यांचा सत्कार चेअरमन मा कल्याणराव नेमाने सत्यनारायण मुंदडा पोलीस पाटील भारत गायकवाड सुभाष लोहकरे संतोष पातकळ सुधाकर गोरे अशोक पातकळ प्राचार्या कुलथे मॅडम यांच्यासह सरपंच उपसरपंच सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभय गोरे यांच्यासह सर्व सदस्य व मान्यवरांनी
केला .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक श्री तुकाराम भगत यांनी केले . सर्व पदाधिकारी ग्रामस्थ पालकांसह युवावर्गाने नाट्यनिर्मिती व सादरीकरणाबद्दल बालकलाकारांचे अभिनंदन केले आहे . कार्यकमाचे आभार जेष्ठ नेते अशोकराव पातकळ यांनी मानले .
