
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१८८ वा दिवस
राष्ट्र म्हणजे काय तर व्यष्टीच्या समष्टीशिवाय दुसरे काहीही नाही. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राचे आपले स्वतःचे एक जीवनव्रत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या जाती_धर्म_समूहांना एकत्रित ठेवण्यासाठी ते आवश्यक असते. हे राष्ट्र जोपर्यंत अशा आदर्शांवर चालत राहते तोपर्यंतच ते अखंडित व अविनाशी असते. परंतु अशा राष्ट्राने जर आपल्या जीवनव्रताचा, मूल्यांचा त्याग केला आणि ते दुसऱ्याच एखाद्या ध्येयाच्या मागे धावायला लागले वा इतर राष्ट्रांचे अनुकरण करायला लागले तर त्यांचे जीवन संपेल असे समजायला काहीच हरकत नाही. आणि थोड्याच दिवसात असे राष्ट्र पूर्णपणे लयास जाईल.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन २ शके १९४७
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६
★ १८२९ कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा स्मृतीदिन
★ १८९४ सुप्रसिध्द वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर जन्मदिन.
★ आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन.
