
सिन्नर ( प्रतिनिधी ) सिन्नर शहरातील सिद्धेश्वर नगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले. “जय शिवराय, जय भवानी” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
नगरातील लहान मुला-मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाबाई यांच्या वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाला सिन्नर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, नगरसेवक पंकज दादा जाधव, मा. दत्ताभाऊ हांडे, मा. देवराम खेताडे सर, मा. जाधव साहेब,मा.रंजनाताई खालकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित नवनिर्वाचित नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांचा नगरातील महिला मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला,तर इतर मान्यवरांचा सत्कार नगरातील तरुणांच्या हस्ते करण्यात आला.
सिद्धेश्वर नगर येथील मा.संतोष भाऊ डावखर यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सवाचा कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिवरायांच्या विचारांना उजाळा देत सामाजिक एकोपा व राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला.
यावेळी सिद्धेश्वर नगरातील महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
