
सिन्नर (प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संत रविदास नगर पिंपरी नाका सिन्नर येथे उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
या कार्यक्रमाचे सुञसंचलन श्रावण वाघ यांनी केले.व प्रास्ताविक मनोज देशमुख यांनी केले अध्यक्षस्थानी महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की छत्रपती शिवरायांनी रयत गुलामीच्या अंध:कारात बुडाली असताना एका नव्या युगाचा प्रारंभ करणाऱ्या, स्वराज्य स्थापन करून अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना न्याय देणाऱ्या सर्वोत्तम युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले अशा महान रयतेचे राजे यांच्या इतिहास राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले यांनी सर्व प्रथम रायगडावर रयतेचे कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली व जगात सर्व प्रथमच १९ फेब्रुवारी १८६९ रोजी “शिवजयंती” साजरी करून शिवजयंतीचे जनक ठरले.ज्या शिवराय यांनी ३६० किल्ले बांधले,व जिंकले तेव्हां कुठल्याही प्रकारच्या अंध-श्रध्देला खत-पाणी घातले नाही, कुठल्याही प्रकारचे वास्तूपूजन वा सत्यनारायन पूजन केले नाही, किंवा स्वारी करतांना कुठलाही मुहूर्त पाहिला नाही..स्वकर्तुत्वाने लोक कल्याणाची कामगिरी करतांना जाती धर्मा ची कास न धरता, जन कल्याण हिताचे “शिवराज्य” प्रस्थापित करून सामराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्या महान जानता राजा ला मानाचा मुजरा
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्रावण वाघ नगरसेवक मनोज देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी उपस्थितांचे आभार. बाळासाहेब तूपे यांनी मानले
या कार्यक्रमासाठी महामित्र दत्ता वायचळे जिल्हाध्यक्ष श्रावण वाघ, नगरसेवक मनोज देशमुख तालुकाध्यक्ष बाळासाहेब तुपे,शहराध्यक्ष सचिन आहेर तालुका संपर्कप्रमुख भाऊसाहेब शिलावट बाळू आहिरे किशोर आहिरे भाऊसाहेब ठाकरे ताराचंद भदाणे शिवाजी ठाकरे नरेंद्र आहेर आकाश आहिरे श्रावण आहिरे योगेश आहिरे विकी आहिरे देवा आहिरे केशव आहिरे श्रावण आहिरे केदु आहिरे पवन आहेर दयानंद बटाव ताराबाई आहेर मंदाबाई आहेर रंजनाबाई आहेर जिजाबाई आहिरे सुनिता आहिरे शोभा सोनवणे पुजा फंगाल आदि उपस्थित होते
