
नांदगाव ( प्रतिनिधी) येथील शिवसृष्टी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात पार पडला यावेळी आमदार श्वास कांदे आणि अंजुम कांदे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा आणि दुग्धनाभिषेक करण्यात आला.

मंत्रोच्चार आणि ढोल ताशांच्या गजरात परिसर शिवभक्तिमय झाला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष नूतन कासलीवाल हे सपत्नीक तसेच आमदार सुहास कांदे सपत्नीक पूजेस बसले. मतदार संघातील 25 आमंत्रित पुरोहितांच्या वेदमंत्रांनी वातावरण दुमदुमले होते. विधिवत पूजनानंतर क्रेनच्या सहाय्याने शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला.

यावेळी गंगाजल, गुलाबजल, पंचामृत ,दूध ,फळांचारस, आणि पाण्याने अभिषेक करण्यात आला. महाराजांना पुष्पहार अर्पण करून उपस्थित शेकडो शिवप्रेमींनी सामूहिक आरती केली. फरहान खान, ज्ञानेश्वर कांदे, धनंजय कांदे,मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील, नांदगावचे नगराध्यक्ष सागर हिरे,शिवसेना पदाधिकारी,महिला आघाडी,व युवासेना पदाधिकारी,तसेच शिवप्रेमींनी गर्दी केली होती.

यावेळी आमदार सुहास कांदे यांनी सर्व शिवप्रेमीना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याचे सांगत त्यांनी शिवसृष्टी घ्या पुढील विकासासाठी १८ कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याची माहिती दिली.
काही क्षणचित्रे



